

Nanded Yellow Alert
esakal
नांदेड: प्रादेशिक हवामानशास्त्र केंद्र, मुंबई यांनी १६ मार्च रोजी दिलेल्या सूचनेनुसार नांदेड जिल्ह्यासाठी १६ व १९ मार्च या चार दिवसांसाठी येलो अलर्ट जारी केला आहे. १६ व १७ मार्च हे दोन दिवस जिल्ह्यात तुरळक ठिकाणी ताशी ३० ते ४० किमी वेगाने वादळी वारे वाहण्याची, विजेच्या कडकडाटासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता वर्तविण्यात आलेली आहे.