esakal | Video - नांदेडची केळी इराणला, ‘या’ कंपनीचा पुढाकार, वाचा
sakal

बोलून बातमी शोधा

फोटो

जिल्ह्यातील दोन कंटेनर इराणला पाठविण्यात आले. यंदाच्या हंगामातील पहिल्यांदाच दोन कन्टेनर पाठविण्यात आल्याचे सांगण्यात आले. अर्धापूर येथील शंभुनाथ शेतकरी प्रोड्युसर कंपनीच्या पुढाकारातून ही निर्यात करण्यात आली आहे.

Video - नांदेडची केळी इराणला, ‘या’ कंपनीचा पुढाकार, वाचा

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

अर्धापूर (जिल्‍हा नांदेड) : तालुक्यातील केळीने देशासह विदेशातही डंका लावला असून सध्याच्या अशांत व कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील दोन कंटेनर इराणला पाठविण्यात आले. यंदाच्या हंगामातील पहिल्यांदाच दोन कन्टेनर पाठविण्यात आल्याचे सांगण्यात आले. अर्धापूर येथील शंभुनाथ शेतकरी प्रोड्युसर कंपनीच्या पुढाकारातून ही निर्यात करण्यात आली आहे. पुढील काळात निर्यात दररोज होणार असून पॅकिंग, ब्रँडिंग यासह इतर कामासाठी पश्चिम बंगालमधून सुमारे दोनशे कामगार या ठिकाणी कार्यरत आहेत. गेल्या वर्षी एक हजार टन केळी निर्यात करण्यात आली होती.

जिल्ह्यातील अर्धापूर, मुदखेड, हदगाव, नांदेड, हिंगोली जिल्ह्यातील वसमत, कळमनुरी तालुक्यातील परिसरात केळीची लागवड मोठ्या प्रमाणावर करण्‍यात येते. या भागातील केळीला देशात व विदेशातही मोठी मागणी असल्यामुळे शेतकरी प्रोड्युसर कंपनी निर्यातीसाठी पुढे येत आहे. अर्धापूर येथील शंभुनाथ शेतकरी प्रोड्युसर कंपनी गेल्या काही वर्षापासून केळीची निर्यात करीत आहे. यापूर्वी पाकिस्तान, अफगाणिस्तान, इराक या देशात निर्यात केली आहे. 

येथे क्लिक करा शाळा सुरू करण्यासाठी संपर्क अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या - कुठे ते वाचा

यंदाच्या हंगामातील पहिले दोन कंटेनर इराणला पाठविण्यात आले

यंदाच्या हंगामातील पहिले दोन कंटेनर इराणला पाठविण्यात आले आहेत. केळीच्या झाडाची कापणी ते पूर्ण डबाबंद पॅकिंगसाठी विशेष काळजी घेण्यात येत असून यासाठी खास पश्चिम बंगालमधून कामगारांना बोलावण्यात आले आहे. केळीच्या फण्या कापणी, निर्जंतुकीकरण करणे, डब्यात पॅकिंग करणे, घडाला डाग लागू न देणे आदी कामे करावी लागतात. मालवाहतूक ट्रकद्वारे मुंबई येथील जवाहरलाल नेहरू बंदरातून ही केळी इराणला रवाना होणार आहे. 

हेही वाचा बुधवारी दोन पॉझिटिव्ह रुग्णांची भर 

कंपनीचे सभासद करणे सुरू असल्याची माहिती- निलेश देशमुख

शंभुनाथ शेतकरी प्रोड्युसर कंपनी निर्यातक्षम केळी उत्पादन करण्यासाठी पुढाकार घेत असून यंदा शंभर एकरावर विशेष लक्ष देऊन काम करण्यात येत आहे. यात घडाला आच्छादन करणे, समान लांबीची जाडीचे घड कापणे, खतांची मात्रा, फुल तोडणे, प्रमाणीकरण करणे, पॅकिंग आदीबाबत माहिती देऊन काम करण्यात येत आहे. यासाठी सुमारे २० लाख खर्च कंपनी करीत आहे. पुढील वर्षी अमर्याद शेतकरी या उपक्रमात सहभागी होऊ शकतात. कंपनीचे सभासद करणे सुरू असल्याची माहिती निलेश देशमुख बारडकर यांनी दिली.