National Flag : नांदेडचा तिरंगा देशभरात; दिल्लीचा लाल किल्ला ते अगदी ग्रामपंचायतपर्यंत

स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त गेल्या वर्षीपासून ‘हर घर तिरंगा’ अभियान राबविले जात आहे. त्यामुळे राष्ट्रध्वजाची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे.
Nanded National Flag
Nanded National Flagsakal

नांदेड - दिल्लीचा लाल किल्ला ते मुंबईतील मंत्रालय आणि जिल्हाधिकारी कार्यालयांपासून ते ग्रामपंचायती आदींसह शासकीय, निमशासकीय कार्यालयांवर स्वातंत्र्यदिनी, प्रजासत्ताकदिनी आणि महाराष्ट्रात महाराष्ट्रदिनी डौलाने फडकणारा तिरंगा नांदेडमध्ये तयार होतो. देशभरात नांदेडसह चार ठिकाणी खादीच्या राष्ट्रध्वजाची निर्मिती होते.

स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त गेल्या वर्षीपासून ‘हर घर तिरंगा’ अभियान राबविले जात आहे. त्यामुळे राष्ट्रध्वजाची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. नांदेड शहरातील हिंगोली गेटजवळ मराठवाडा खादी ग्रामोद्योग समितीचे कार्यालय आहे.

या समितीची सुरुवात १९५५ मध्ये झाली आणि संस्था म्हणून १९६७ मध्ये नोंदणी झाली. या संस्थेच्या वतीने खादीच्या राष्ट्रध्वजाची निर्मिती केली जाते. येथे मोटार, टेबलवरील झेंड्यापासून ते दिल्लीच्या लाल किल्ल्‍यासह मंत्रालय ते ग्रामपंचायतीच्या कार्यालयांवर फडकविण्यात येणाऱ्या राष्ट्रध्वजाची खादीपासून निर्मिती केली जाते.

या ध्वजाची किंमत ६० रुपयांपासून २९ हजार रुपयांपर्यंत आहे. एकूण ११ आकाराचे राष्ट्रध्वज बनविले जातात. एक एप्रिल ते ११ ऑगस्टपर्यंत सुमारे साडेसहा हजार राष्ट्रध्वजांची विक्री झाल्याची माहिती समितीचे संचालक व्यवस्थापक महाबळेश्वर मठपती यांनी दिली.

खादीच्या कापडाची निर्मिती उदगीर (जि. लातूर) येथे होते. त्यानंतर हे कापड रंगरंगोटीसाठी अहमदाबाद (गुजरात) येथे पाठविण्यात येते. त्यानंतर येथे आणून अशोक चक्र तयार करून घेतले जाते. सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यावर कारागिरांमार्फंत शिलाई होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com