नांदेड : पक्षविरोधी कारवायामुळेच भिलवंडेंची हकालपट्टी

राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष भोसीकर यांची माहिती
Nagar Panchayat elections
Nagar Panchayat electionssakal

नांदेड : राष्ट्रवादी कॉँग्रेसचे (Nationalist Congress party) नायगाव तालुकाध्यक्ष भास्कर भिलवंडे यांनी नगरपंचायत निवडणुकीत (Nagar Panchayat elections) पक्षविरोधी कारवाया केल्यामुळेच त्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. याबाबत प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि प्रदेश सरचिटणीस शिवाजीराव गर्जे यांच्या आदेशानुसार ही कार्यवाही करण्यात आल्याची माहिती राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष हरिहरराव भोसीकर यांनी शुक्रवारी (ता. १४) पत्रकार परिषदेत दिली.

Nagar Panchayat elections
जळगावकरांची कोरोना चाचणीकडे पाठ; शहरात वाढताय सुपर स्प्रेडर

पक्षाचे निरीक्षक व जिल्हा उपाध्यक्ष सुभाष गायकवाड, प्रदेश सरचिटणीस वसंत सुगावे पाटील यांच्यासमवेत नांदेड येथील बैठकीला श्री. भिलवंडे आणि इच्छुक उमेदवार उपस्थित होते. त्यानंतर नातेवाईकाचे लग्न असल्याचे सांगून ते मुंबईला निघून गेले. त्यानंतर मोबाईल बंद करून बसले व पुढे नायगाव नगरपंचायतीच्या निवडणुकीत भिलवंडे यांनी तडजोडीचे राजकारण करत पक्षविरोधी कारवाया केल्या. या सर्वाची नोंद वरिष्ठांनी घेतली असल्याचे श्री. भोसीकर यांनी सांगितले.

Nagar Panchayat elections
24 तासांत 2 लाख 67 हजार रुग्णांची नोंद, मृत्यूही वाढले

नायगाव तालुक्याला नेहमी विविध रुपाने संधी देण्याचा प्रयत्न केला आहे. जे भिलवंडे यांना जमले नाही ते कार्याध्यक्ष यांनी करून दाखवले आहे. त्यामुळे भिलवंडे यांना प्रदेशाध्यक्षांच्या आदेशान्वये तालुकाध्यक्ष पदावरून काढून टाकण्यात आल्याचे जिल्हाध्यक्ष श्री. भोसीकर यांनी सांगितले. पक्षश्रेष्ठींनी देखील भिलवंडे यांच्यावर नाराजी व्यक्त केली असून जिल्ह्यातील अशा प्रवृत्तीच्या इतर कार्यकर्त्यांवरही कार्यवाही होण्याची शक्यता आहे. या पत्रकार परिषदेला राष्ट्रवादीचे सरचिटणीस प्रा. डी. बी. जांभरूणकर, जिल्हा उपाध्यक्ष सुभाष गायकवाड, राष्ट्रवादी युवकचे जिल्हाध्यक्ष धनंजय सुर्यवंशी, अर्धापूर तालुकाध्यक्ष चंद्रकांत टेकाळे आदी उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com