esakal | वृत्तपत्र विक्रेता दिन : शेडसाठी मनपाकडून २५ लाख मंजूर- आ.राजूरकर
sakal

बोलून बातमी शोधा

file photo

नागापूरकर पुरस्कार उमरीकर, वडगावकर यांना प्रदान- वृत्तपत्र विक्रेता दिन साजरा

वृत्तपत्र विक्रेता दिन : शेडसाठी मनपाकडून २५ लाख मंजूर- आ.राजूरकर

sakal_logo
By
प्रल्हाद कांबळे

नांदेड : शहरातील वृत्तपत्र विक्रेते उन, पाऊस, वारा अशा तिन्ही ऋतूमध्ये उघड्यावर बसून काम करीत होते. याबाबत जिल्हा वृत्तपत्र वितरक विकास मंडळाने सतत पाठपुरावा केल्यामुळे आम्ही आमच्या जाहीरनाम्यातही काही मागण्या घेतल्या होत्या. आता मनपाकडून वृत्तपत्र विक्रेत्यांना विसावा उद्यानात जागा देण्यात आली आहे. लवकरच तेथे सेंटर शेड उभारले जाणार असून त्यासाठी २५ लाख रुपये मंजूर करण्यात आल्याची माहिती आमदार अमरनाथ राजूरकर यांनी दिली आहे.


महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र विक्रेता संघटनेशी संलग्न जिल्हा वृत्तपत्र वितरक विकास मंडळाचा २१ वा वर्धापन दिन, भारतीय वृत्तपत्र विक्रेता दिन, वाचन प्रेरणा दिन, गुणवंतांचा सत्कार, सायकल स्पर्धेचे बक्षीस वितरण व कॉ.अनंतराव नागापूरकर स्मृती पत्रकारिता पुरस्कार आणि वृत्तपत्र विक्रेता पुरस्कार सोहळा असे भरगच्च कार्यक्रम माता गुजरीजी विसावा उद्यानात गुरुवारी (ता. १५) ऑक्टोबर रोजी पार पडले. यावेळी आ. राजूरकर अध्यक्षस्थानावरुन बोलत होते. व्यासपीठावर आ. बालाजी कल्याणकर, आ. मोहन हंबर्डे, महापौर मोहिनी येवनकर, विजय येवनकर, स्थायी समिती सभापती अमित तेहरा, सभागृह नेता वीरेंद्रसिंघ गाडीवाले, माजी उपमहापौर सतीश देशमुख तरोडेकर, कामगार नेते प्रदीप नागापूरकर, प्रकाश कांबळे, वृत्तपत्र विक्रेता संघटनेचे प्रदेश सरचिटणीस बालाजी पवार यांची प्रमुख उपस्थिती होती.

सकाळच्या वतीने वृत्तपत्र विक्रेत्यांचा सन्मान

प्रास्तविकात बालाजी पवार यांनी नांदेडमध्ये या संघटनेची स्थापना झाली आणि तिचा विस्तार राज्यभर झाला. त्यामागे सततचा संघर्ष,संघटन बांधणी, चिकाटी आणि अनेकांचे योेगदान असल्याचे सांगितले. कोरोना काळातही वृत्तपत्र विक्रेत्यांनी न डगमगता घरोघरी वृत्तपत्र वाटप केल्याचा गौरवही त्यांनी केला. सकाळ माधयम समुहाच्या वतीने वृत्तपत्र विक्रेत्यांचा सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला. त्याचबरोबर अल्पोपहाराची व्यवस्था करण्याात आली होती.

आमदार राजूरकर यांनी पेपरविक्रेत्यांच्या अडचणी जाणून घेतल्या

यावेळी बोलताना आ. राजूरकर म्हणाले की, मनपाने अ. भा. मराठी नाट्य परिषदेच्या कार्यालयासाठीही शंकरराव चव्हाण प्रेक्षागृहात जागा दिली आहे. तसेच महापौर येवनकर झाल्या बरोबरच वृत्तपत्र विक्रेत्यांसाठी सोयीची विसावा उद्यानातील जागा देण्यात आली आहे. या जागेवर सेंटर शेड, संडास, बाथरुम, वीज, पाणी आदी सुविधाही उपलब्ध करुन दिल्या जाणार आहेत. यासाठी २५ लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत. बीएसयुपी अंतर्गत या विक्रेत्यांना घरकुल देण्याबाबतही मनपा पदाधिकाऱ्यांनी लक्ष घालावे.

महापौर येवनकर काय म्हणाल्या

महापौर सौ.येवनकर म्हणाल्या की, पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या मार्गदर्शनात आम्ही जाहीरनाम्यानुसार आश्वासन पूर्ती करीत आहोत. वृत्तपत्र विक्रेत्यांची मेहनतीची कामे पाहता त्यांना आम्ही मदतीचा हात देत आहोत. वृत्तपत्र विक्रेत्यांसाठी कल्याणकारी मंडळाबाबत विधीमंडळात आपण व आ. राजूरकर संयुक्त प्रयत्न करणार असल्याचे आ. बालाजी कल्याणकर यांनी सांगितले.

सायकल स्पर्धकांना पारितोषक

यावेळी सायकल स्पर्धेतील विजेते जुनेद पठाण, मारोती जाधव यांना सायकल तर तेजस हिंगोलेला अकराशे रुपये रोख, संघरत्न बुक्तरे, दीपक तिडके यांना उत्तेजनार्थ बक्षीस वाटप करण्यात आले. तसेच तुषार तुकाराम हंबर्डे, खुशी बालाजी चंदेल, वैष्णवी अवधूत गवारे, अनिकेत अनिल मेडेवार, वैष्णवी अशोक खुने, नेहा एकनाथ जल्देवार, नवोदित अभिनेत्री माधुरी राजेश्वर लोकरे या गुणवंतांचा आमदारद्वय व महापौरांच्याहस्ते सत्कार करण्यात आला.

अनेकांना पत्रकारिता पुरस्कार

तसेच कॉ.अनंतराव नागापूरकर स्मृती पत्रकारिता पुरस्कार कृष्णा उमरीकर, वृत्तपत्र विक्रेता राज्यस्तरीय पुरस्कार गणेश वडगावकर यांना आ. राजूरकर यांच्याहस्ते प्रदान करण्यात आला. यावेळी गजानन काळे, किरण कुलकर्णी, उत्तम बुक्तरे, मारोती कंधारे, बाळासाहेब टकले, विजय पोवार, विशाल सोनटक्के, गोविंद कंधारे, राजेश भोळे, सुभाष लोणे, गणपत बनसोडे, श्रावण नरवाडे, इम्रान, सोनकांबळे यांनी संघटनेेच्या कार्याला शुभेच्छा दिल्या.

यांनी घेतले परिश्रम

कार्यक्रम यशस्वीतेसाठी चंद्रकांत घाटोळ, अवधूत सावळे, बाबू जल्देवार, सरदारसिंह चौहान, संदीप कटकमवार, चेतन चौधरी, गजानन पवार, शुभम पवार, विनायक आंधे, अनुप ठाकूर, रामेश्वर पवार, लखन नरवाडे, सतीश कदम, बालाजी सुताळे, खय्यूम पठाण, सुदर्शन कऱ्हाळे, माधव मामीडवार, शंकर हुसे, दिलीप सोनटक्के, संजय पाटील, बाबुराव थोरात, राजेश्वर लोकरे, तुकाराम हंबर्डे, प्रकाश भरकडे, संगमनाथ भालके यांनी प्रयत्न केले.