esakal | पहिल्याच दिवशी रेमडेसिव्हीर इंजेक्शनासाठी फिरवाफिरवी 
sakal

बोलून बातमी शोधा

File Photo

जिल्हा शल्यचिकित्सक यांनी कागदपत्रावर स्वाक्षरी करण्याची जबाबदारी दुसऱ्याकडे सोपवल्याने पहिल्याच दिवशी कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या नातेवाईकांची फिरवाफिरवी केल्याने जिल्हा आरोग्य विभागाच्या या भोंगळ कारभारांविषयी अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले.

पहिल्याच दिवशी रेमडेसिव्हीर इंजेक्शनासाठी फिरवाफिरवी 

sakal_logo
By
शिवचरण वावळे

नांदेड - सामान्यातल्या सामान्य कोरोनाबाधित रुग्णास वेळेवर रेमडेसिव्हिर इंजेक्शन स्वस्त उपलब्ध व्हावे, यासाठी पंतप्रधान जन आरोग्य योजनेतंर्गत जिल्ह्यातील दोन मेडीकल स्टोअरला गुरुवारी (ता. १५) परवानगी देण्यात आली आहे. अत्यावश्‍यक असलेल्या रुग्णास रेमडेसिव्हीर इंजेक्शन देण्यासाठी जिल्हा शल्यचिकित्सक यांच्याकडे जबाबदारी देण्यात आली आहे. मात्र, जिल्हा शल्यचिकित्सक यांनी कागदपत्रावर स्वाक्षरी करण्याची जबाबदारी दुसऱ्याकडे सोपवल्याने पहिल्याच दिवशी कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या नातेवाईकांची फिरवाफिरवी केल्याने जिल्हा आरोग्य विभागाच्या या भोंगळ कारभारांविषयी अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले. 

अन्न व औषध प्रशासन विभागामार्फत विष्णुपुरी येथील जनेरिक औषधी दुकान आणि वर्कशॉप येथील श्रीनाथ मेडीकल अशा दोन औषधी दुकानास रेमडेसिव्हीर इंजेक्शन ठेवण्याची मुभा दिली आहे. अतिशय कमी मार्जिनमध्ये इंजेक्शनची विक्री करणे भाग असले, तरी दोन्ही औषधी विक्रेत्यांनी समाजसेवेच्या माध्यामातून हे व्रत स्विकारले आहे. परंतु त्यासाठी अनेक अटी ठेवण्यात आल्या आहेत. महत्वाचे म्हणजे इंजेक्शन कुणाला द्यायचे याची सर्व जबाबदारी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निळंकठ भोसीकर यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. परंतु जिल्हा शल्यचिकित्सक यांच्याकडे जिल्ह्यातील सर्व आरोग्य यंत्रणेचा ताण वाढल्याने त्यांना काम करताना अनेक अडचणी येत आहेत. 

हेही वाचा- ‘रेमडेसिव्हीर’चा साठा करायचा कुणाच्या भरवशावर, रुग्णसंख्या घटली, दोन मेडिकलवर आजपासून स्वःस्तात ‘रेमडेसिव्हीर’ इंजेक्शन ​

पहिल्या दिवशी स्वस्तातल्या इंजेक्शनापासून अनेकजण वंचित 

त्यामुळे त्यांच्यावरील कामाचा ताण कमी करण्यासाठी रेमडेसिव्हिर इंजेक्शनाची मागणी करण्यासाठी आलेल्या रुग्णांच्या नातेवाईकास अर्जावर स्वाक्षरी करण्याची डॉ. लोमटे यांच्याकडे जवाबदारी देण्यात आली आहे. परंतु, ते देखील कामात व्यस्त असल्याने आणि उपलब्ध नसल्याने पहिल्याच दिवशी कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या नातेवाईकांना रेमडेसिव्हिर इंजेक्शन मिळविण्यासाठी चांगलीच धडपड करावी लागली. 

हेही वाचले पाहिजे- नांदेडमध्ये ‘गर्ल्स सेफ्टी मिशन’ लवकरच- एसपी प्रमोद शेवाळे

नाईलाजाने पाच हजार चारशे रुपये किमतीचे इंजेक्शन घेण्यास भाग पडले

इतके करुन देखील इंजेक्शनासाठी शिफारस म्हणून देण्यात आलेल्या अर्जावर अनेक त्रुटी आढळून येत असल्याने औषधी दुकानमालकांनी देखील रेमडेसिव्हीर इंजेक्शन देण्यास नकार दिल्यामुळे अनेक पॉझिटिव्ह रुग्णास रेमडेसिव्हीरच्या स्वस्तातल्या इंजेक्शनापासून वंचित रहावे लागले आहे. अनेक नातेवाईकांनी नाईलाजाने पाच हजार चारशे रुपये किमतीचे इंजेक्शन घेण्यास भाग पडले आहे. 

कागदपत्रांची ही प्रक्रिया सुरळीत  

रजिस्ट्रेशन नंबर बरोबर नसल्याने अनेकांना इच्छा असताना देखील त्यांना रेमडेसिव्हिर इंजेक्शन देता आले नाही. पहिला दिवस असल्याने दुपारपर्यंत अडचणी येत होत्या. परंतु त्यानंतर कागदपत्रांची ही प्रक्रिया सुरळीत झाल्याने अनेकांना इंजेक्शन पुरविण्यात आले. 
- श्रीनाथ हुंडीवाला, श्रीनाथ मेडीकल स्टोअर्स.