ध्वनिप्रदूषण चिडखोरपणाला आमंत्रण; तरुणाईची मस्ती वयस्कांसाठी धोकादायक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ध्वनिप्रदूषण चिडखोरपणाला आमंत्रण; तरुणाईची मस्ती वयस्कांसाठी धोकादायक
ध्वनिप्रदूषण चिडखोरपणाला आमंत्रण; तरुणाईची मस्ती वयस्कांसाठी धोकादायक

ध्वनिप्रदूषण चिडखोरपणाला आमंत्रण; तरुणाईची मस्ती वयस्कांसाठी धोकादायक

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नांदेड : विकासाच्या नादामध्ये निसर्गचक्रात अडथळे निर्माण होत असल्याने पर्यावरणाचे संतुलन दिवसेंदिवस बिघडत आहे. ध्वनी प्रदूषणातही वेगाने वाढ होत असून कानात सतत आवाज येत राहिल्याने चिडचिडेपणा आणि निद्रानाशासारखे आजार होण्याचे प्रमाण वाढू लागले आहे.

हेही वाचा: पटियाला मधुन लढणार कॅप्टन अमरिंदर सिंह; म्हणाले "मी पळून..."

शहराला जलप्रदूषण, ध्वनी आणि वायू प्रदूषणाचा फटका बसतो आहे. ध्वनी प्रदूषणाला आपण गंभीरतेने घेतलेले नाही. हे प्रदूषण अदृ्श्य असलेतरी जीवघेणेही आहे. युरोपियन देशात घेण्यात आलेल्या संशोधनात आणि जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालातून याची गंभीरता लक्षात येते. वाढलेल्या आवाजामुळे अनेक शारीरिक आणि मानसिक आजार होऊ लागले आहे. ध्वनी ही एक लहर आहे. माणसासाठी ४० डेसिबल आवाज हा मधुर असतो. मात्र, जसजसा तो ६० च्या वर जातो तो कर्कश होत जातो. ७० डेसिबलच्या वरील आवाज हा त्रासदायक ठरतो. सतत ८० आणि ९० डेसिबल आवाज हा बहिरेपणा आणतो. सर्व शरीरात कंपन निर्माण करतो. तसेच मानसिक रोगांना कारणीभूत होतो. लग्न किंवा इतर समारंभात १००-१२० डेसिबल आवाजाचे उत्सर्जन ऐकायला मिळते, हे वयस्क आणि आजारी लोकांसाठी अत्यंत धोकादायक असते.

होणारे आजार

  • बहिरेपणा

  • निद्रानाश

  • अस्वस्थता

  • डोकेदुखी

  • चिडचिड

  • हृदयविकार

  • रक्तदाब वाढणे

  • हार्मोन्समध्ये बदल

  • कोलेस्ट्रोलमध्ये वाढ

हेही वाचा: लसीकरण वाढवण्यासाठी केंद्राची नवी आयडीया; लकी ड्रॉ आणि इतर उपक्रमांचा घेणार आधार

"ध्वनी प्रदूषणाची पातळी वाढत राहिल्यास आरोग्याच्या अनेक समस्यांना तोंड द्यावे लागेल. आजच सावध होऊन सरकार आणि प्रशासनाने कायद्याची कडक अमलबजावणी करणे गरजेचे आहे."

- श्यामराव काळे (ज्येष्ठ नागरिक)

"ध्वनी प्रदूषण रोखण्यासाठी कायद्याची कडक अमलबजावणी करावी. चौकांमध्ये सिग्नल सुटल्यानंतर हॉर्न वाजविण्याची स्पर्धा लागते. तेव्हा आवाजाची तीव्रता ८० ते १०० डेसिबलपेक्षाही अधिक होते. सलग पाच दिवस आठ तासाच्यावर ८० डेसिबल आवाज ऐकला तर कायमस्वरूपी बहिरेपणा येऊ शकते. त्यामुळे चौकात विनाकारण हॉर्न वाजविण्यावर आणि प्रेशर हॉर्नवर बंदी आणावी."

- डॉ. रामप्रसाद व्ही. मनियार

loading image
go to top