esakal | चाचणी अहवालांची प्रलंबित संख्या वाढली, रविवारी ३५ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह
sakal

बोलून बातमी शोधा

file Photo

रविवारी एक हजार ६२ पैकी एक हजार २१ अहवाल निगेटिव्ह, ३५ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.

चाचणी अहवालांची प्रलंबित संख्या वाढली, रविवारी ३५ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह

sakal_logo
By
शिवचरण वावळे

नांदेड - जिल्ह्यातील कोरोना संशयित रुग्णांची स्वॅब चाचणी वाढल्याने व शाळेतील शिक्षक व कर्मचारी यांचे स्वँब तपासणीसाठी घेतले जात आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील स्वॅब चाचणीचे अहवाल मोठ्या प्रमाणात प्रलंबित राहत आहेत. शनिवारी (ता. ३०) तपासणीसाठी घेतलेल्या अहवालापैकी रविवारी (ता. ३१) एक हजार ६२ अहवाल प्राप्त झाले आहेत. दुसरीकडे रविवारी पुन्हा ३९६ स्वॅब अहवाल प्रलंबित होते.

 
रविवारी एक हजार ६२ पैकी एक हजार २१ अहवाल निगेटिव्ह, ३५ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. नांदेड महापालिकाक्षेत्रात रविवारी १४, उमरी- एक, भोकर- तीन, नायगाव - पाच, हदगाव - दोन, बिलोली- एक, कंधार - एक, माहूर - एक, परभणी - एक, हिंगोली - एक, लातूर - तीन असे ३५ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहे. जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा २२ हजार ५३७ इतका झाला आहे. 

हेही वाचा- नांदेड : बहिणीची हत्या करणारा आरोपी भाऊ पोलिस कोठडीत

बाधित रुग्णांचे प्रमाण ९५.५ टक्के

विष्णुपुरी शासकीय रुग्णालय - पाच, महापालिकेंतर्गत गृविलगीकरण कक्षातील - १०, गोकुंदा -एक, कंधार - पाच, हदगाव - एक, माहूर - एक व खासगी रुग्णालयातील पाच असे २८ रुग्ण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना रुग्णालयातुन सुटी देण्यात आली. आतापर्यंत २१ हजार ४२२ रुग्ण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना रुग्णालयातुन सुटी देण्यात आली आहे. सध्या ३२६ कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरु असून, त्यामधील १२ पॉझिटिव्ह रुग्णांची प्रकृती अती गंभीर आहे. रविवारी रात्री उशिरापर्यंत ३९६ संशयित स्वॅब अहवालाची रात्री उशिरापर्यंत तपासणी सुरू होती. उपचारानंतर बरे होणाऱ्या बाधित रुग्णांचे प्रमाण ९५.५ टक्के इतके आहे. 

हेही वाचा- औंढा नागनाथच्या प्राचार्याकडून नांदेडच्या ज्येष्ठ नागरिकास बेदम मारहाण

नांदेड कोरोना मीटर ः 

एकूण कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण - २२ हजार ५३७ 
एकूण कोरोनामुक्त रुग्ण - २१ हजार ४२२ 
एकूण मृत्यू - ५८६ 
रविवारी पॉझिटिव्ह रुग्ण - ३५ 
रविवारी कोरोनामुक्त रुग्ण २८ 
रविवारी मृत्यू- शुन्य 
उपचार सुरु - ३२६ 
गंभीर रुग्ण - १२ 
स्वॅब तपासणी सुरु - ३९६