Online Betting : ऑनलाइन सट्टाबाजार धोकादायक; आयपीएलच्या थरारात सट्टेबाजीसाठी बुकी झाले सक्रिय
IPL 2025 : आयपीएल क्रिकेट सामन्यांच्या धर्तीवर ऑनलाईन सट्टेबाजार जोमात सुरू झाला असून बुकी सक्रिय झाले आहेत. युवक मोठ्या संख्येने या जाळ्यात सापडत असल्याने अनेक कुटुंबे उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहेत.
कंधार : नुकत्याच सुरुवात झालेल्या, पुढील दोन महिने चालणाऱ्या आयपीएल क्रिकेट सामन्यांवर ऑनलाईन सट्टा लावण्यासाठी कंधार शहरासह ग्रामीण भागात बुकी सक्रिय झाले आहेत.