Video : १२५ कुटुंबाच्या मदतीला `ही` संस्था आली धावून

Nanded News
Nanded News

नांदेड : ‘कोरोना’मुळे मागील ४३ दिवसांपासून संपूर्ण देश लॉकडाउन आहे. दरम्यान एकही कुटुंब उपाशी पोटी झोपणार नाही, याची खबरदारी म्हणून शासनाच्या वतीने स्वस्त धान्य दुकानामार्फत तीन महण्यांचे अन्नधान्य देण्यासाठी नियोजन केले. केशरी कार्डवर धान्य दिले जात नव्हते, अशा कार्डवर देखील मे महिण्यापासून धान्य देण्याच्या सूचना सर्व दुकानदारांना दिलेल्या आहेत. असे असले तरी अनेकांना धान्यच मिळाले नाही, हे वास्तव आहे.  

शासनाचे आदेश असले तरी, अनेक कुटुंबियांना स्वस्तधान्य दुकानदार सिधा पत्रिका आॅनलाईन नसल्याचे कारण दाखवत धान्य देण्यास टाळ टाळ करत आहेत. दरम्यानच्या काळात धान्य मिळाले नसले तरी काही कुटुंबियांनी उसनवारी करुन आला दिवस पुढे ढकलण्याचा प्रयत्न केला. परंतु, ४३ दिवसानंतर लॉकडाउन उठला नसल्याने मात्र अनेक कुटुंब हतबल झाली आहेत.
 
हेही वाचा- ‘या’ दहा ग्रामपंचायतीवर प्रशासकाची नियुक्ती

गरजवंत कुटुंबियांचा शोध -
नांदेडच्या इंडियन मेडिकल असोसिएशन  (आयएमए) संघटनेच्या पदाधिकारी यांनी खरोखर गरजवंत कुटुंबियांचा शोध घेऊन त्यांच्यासाठी मदतीचा हात पुढे केला आहे. बुधवारी (ता. सहा) पासून सुरु करण्यात आलेल्या मदत वाटपासाठी शहरातील किन्नर, निराधार आणि परित्यक्ता स्त्रिया यांना अन्न धान्य वाटपासाठी निवड करण्यात आली.  जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत उपजिल्हाधकारी श्री. परदेशी व सैनिक प्रशांत दिवडे यांच्याकडे हे अन्न धान्याचे किट सोपवण्यात आले. हे साहित्य डॉ. नायडू, भारतीय सैन्याचे जवान प्रशांत दिवडे यांच्या हस्ते वाटप करण्यात आले.

शासन घोषणा करून झाले मोकळे
मालेगाव तरोडा खुर्द परिसरातील बेलानगरातील दहा कुटुंबिय मदतीची याचना करत आहेत. प्रशासनातर्फे सर्वांना धान्य मिळेल असे जाहीर करून शासन मोकळे झाले आहे. या भागातील महिला स्वस्त धान्य दुकान क्रमांक एक येथे गेल्या असताना, दुकानदाराने रेशन कार्ड दाखव, अन्यथा रेशन मिळणार नाही असे सांगितले. महिलांजवळ आधारकार्ड होते. असे असंख्य कुटुंबिय आज मदतीसाठी भटकत असून, त्यांची भुकबळीची शक्यता नाकारता येणार नाही. 

जिल्हाधिकारी कार्यालयाकडून मिळालेल्या यादीनुसार किटचे वाटप 
लॉकडाउ मुळे देशात तसेच महाराष्ट्रात सर्वत्र बंद असल्या कारणाने, ज्यांचे पोट तळहातावर आहे किंवा दैनंदिन कामकाजा शिवाय ज्यांची चूल पेटत नाही. अशा कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे.त्यासाठी आम्ही पुढाकार घेत आज पहिल्या टप्प्यात तब्बल १२५ कुटुंबांना जीवनावश्यक वस्तूचे वाटपक केले आहे.  
- डॉ. सुरेश कदम (अध्यक्ष इंडियन मेडिकल असोसिएशनचे, नांदेड )

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com