नांदेड मध्ये परप्रांतीय चोरटयांनी पोलिसांची वाढवली डोकेदुखी

दररोज घरफोडीसह वाढल्यात जबरी चोरी
nanded crime
nanded crime sakal

नांदेड : शहर व जिल्ह्यात घरफोडीसह मोबाईल चोरी, जबरी चोरी तसेच दुचाकी चोरीचे प्रमाण वाढत आहे. (nanded corona update)शहरामध्ये परप्रांतीय चोरटे सक्रिय झाले असून, पोलिसांची डोकेदुखी वाढली असून नागरिकांमध्ये धास्ती बसली आहे.

कोरोना (corona news) शिथिल झाल्यानंतर शहरामध्ये गुन्हेगारी वाढली आहे. दररोज घरफोडीसह जबरी चोरी, दुचाकी चोरी, मोबाईल चोरी आदी घटना घडताना दिसत आहेत. दुचाकी व मोबाईल चोरीचे गुन्हा दाखल होतात, परंतु तपास मात्र लागत नसल्याचे वास्तव आहे. मात्र, दोन दिवसामध्ये स्थानिक गुन्हे शाखेने परराज्यातील टोळी जेरबंद केली आहे. त्यामुळे शहरामध्ये परराज्यातील टोळ्या चोऱ्या करण्यासाठी सक्रीय झाल्याचे स्पष्ट होते आहे.

सोमेश काॅलनीतून मगनपुरा येथील व्यापाऱ्याची साडेसहा लाख रुपये असलेली बॅग अहमदाबाद येथील चोरट्यांनी चोरली होती. तसेच शहरासह जवळच्या जिल्ह्यांत आठवडी बाजारात मोबाईल चोरणारी झारखंड राज्यातील टोळीही जेरबंद झाली आहे. त्यामुळे या टोळ्यांचा मुख्य सुत्रधार शहरातच वावरत असून, त्याचा बंदोबस्त करण्याची मोठी जबाबदारी पोलिसांसह स्थानिक गुन्हे शाखेवर आहे.

nanded crime
आता कसोटीत पंतला कॅप्टन करा; दिग्गजाचा सल्ला

गत तीन वर्षातील आकडेवारी

पोलिस दप्तरी असलेल्या नोंदीनुसार शहर व जिल्ह्यात २०१९ मध्ये एक हजार ५२२, २०२० मध्ये दोन हजार १०० तर २०२१ मध्ये दोन हजार ४०० मोबाईलची चोरी झालेली आहे. त्यापैकी अनुक्रमे ३१०, १५० आणि १८० प्रकरणे उघड झालेले असून, उर्वरीत मोबाईलची प्रकरणे अद्यापही प्रलंबीतच आहेत.

चोरट्यांना दिला जातो पगार

चोऱ्या करणाऱ्या चोरट्यांना पगार दिला जात असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यामुळे चोरीच्या घटनांतील मुख्य सुत्रधार कोण, याचा शोध घेणे आवश्यक आहे. झारखंड येथील चोरट्यांना अटक केल्यानंतर त्यांनी सांगितले की, आम्हाला १५ हजार रुपये महिना मिळतो. विशेषतः या टोळ्यांमध्ये बालकांचाही मोठ्या प्रमाणावर समावेश करण्यात आलेला आहे.(crime news nanded)

nanded crime
अकोला : कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत आणखी दोघांचा मृत्यू

बॅग लिफ्टिंग करणारे रडारवर

शहरात इतवारा, वजिराबाद आणि शिवाजीनगर भागात चोरट्यांनी व्यापाऱ्यांचे पैसे पळविले होते. त्यातील वजिराबादची घटना उघडकीस आली आहे. मात्र, इतर दोन घटनांतील आरोपी अद्यापही (nanded police) पोलिसांना हुलकावणी देत आहेत. सीसीटीव्ही फुटेज (cctv footage) असतानाही आरोपींची ओळख पटू शकलेली नाही. त्यामुळे आता पोलिसांनी बॅग लिफ्टिंग(bag lifting ) करणाऱ्यांवर विशेष लक्ष केंद्रित केले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com