वाढीव वीजबिलामुळे सिडकोतील नागरिकांमध्ये रोष

File photo
File photo

नवीन नांदेड : लॉकडाउनमुळे आधीच आर्थिक संकटात सापडलेल्या सामान्य जनतेला आता विजेचा शॉक लागला आहे. नागरिकांना अव्वाच्या सव्वा विजेची बिलं महावितरणकडून आकारली जात आहेत. लॉकडाऊनमुळे हातात कमी पैसे असताना हजारोंच्या घरात आलेली वीज बिलं कशी भरायची? असा प्रश्न वीज ग्राहकांना पडला आहे. 

कोरोनामुळे आधीच आर्थिक संकटात सापडलेल्या नागरिकांना आता महावितरणने वाढीव वीज बिलांचा शॉक दिला आहे. गेल्या तीन महिन्यांपासून सरासरी वीज बिल देणाऱ्या महावितरणने ग्राहकांना भरमसाट बिल पाठवलेले आहे. ग्राहकांना कमीत कमी तीन हजार ते चार हजार ५०० रुपयांची वीज बिले नागरिकांच्या माथी मारल्या जात आहे. शासनाकडून राशन वा अन्य गोष्टी काही प्रमाणात उपलब्ध करून दिल्या जात असताना महावितरणने दिलेला वाढीव वीजबिलाचा शॉक कसा सहन करणार? हा प्रश्न निर्माण होत आहे. 

दरम्यान महावितरणकडून नेहमीच वीज जपून वापरा, विजेची बचत करा असे सांगितले जाते. बचत करण्यावर वाढीव बिल दिल्या जात असल्याचे लोकांना आलेल्या बिलावरून पाहावयास मिळत आहे. कारण नव्या दरानुसार ० ते १०० युनिटपर्यंत वीज वापर असलेल्या ग्राहकांना त्याचा सर्वाधिक फटका बसला आहे. याउलट शंभर युनिटपेक्षा अधिक वीज वापर करीत असलेल्या ग्राहकांच्या वीज बिलात बचत झाल्याचे दिसत आहे.

एप्रिल पासून दरवाढ
महावितरणाचा झटका एप्रिलपासून सुरू झाला आहे. यात कमी वीज वापर असणाऱ्यांचे बिल वाढले आहेत. कारण वीज बिलांतील स्थिर आकार हा पहिले दरमहा ९० रुपये होता. तो आता ११० रुपये झालेला आहे. त्याच्या वहनाचा आकार हा पूर्वी १.२८ रुपये प्रति युनिट होता, तो आता वाढून १.४५ रुपये प्रति युनिट झाला आहे. वीज आकार हा पहिल्या १०० युनिट्ससाठी पूर्वी ३.०५ रुपये प्रति युनिट होता, तो आता वाढून ३.४६ रु.प्रति युनिट झालेला आहे. 

१०० युनिट्सच्या पुढील १०१ ते ३०० युनिट्स पर्यंतचा दर हा पूर्वी ६.९५ रुपये प्रति युनिट होता, तो आता वाढून ७.४३ रुपये प्रति युनिट झालेला आहे. ३०० युनिट्सच्या पुढील ३०१ ते ५०० युनिट्स पर्यंतचा दर पूर्वी हा ९.९० रुपये प्रति युनिट होता, तो आता वाढून १०.३२ रुपये प्रति युनिट झालेला आहे. ५००च्या पुढे पूर्वी हा ११.५० रुपये प्रति युनिट होता, तो आता ११.७१ झाला आहे. याच वाढीव वीज दराने ग्राहकांना पहिल्यांदाच बिले आलेली आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com