तिहेरी संकटावर करायची मात - खासदार चिखलीकर

अभय कुळकजाईकर
Tuesday, 22 September 2020

कोरोनाचा संसर्ग, पशुधनाला लंपी आजार आणि अतिवृष्टीमुळे खरीपाची पिके धोक्यात असे तिहेरी संकट ओढावले असून त्यावर मात करण्ची असल्याचे खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी सांगितले. त्याचबरोबर तत्काळ पंचनामे करुन जिल्हा प्रशासनाने शेतकऱ्यांना मदत करावी, अशी मागणीही खासदार चिखलीकर यांनी केली आहे. 

नांदेड - पावसाचा कहर त्यामुळे पुर परिस्थिती उद्भवली, खरीप हंगामातील पिके धोक्यात आली. पशुधन लंम्पी आजाराने ग्रासले आहे तर कोरोनामुळे जनजीवन भयभीत आहे. अशा तिहेरी संकटात शेतकरी सापडला आहे. नुकसानग्रस्त भागाची पाहणी करुन पंचनामे करावेत व शेतक-यांना तातडीची मदत द्यावी, अशी मागणी खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी सरकारकडे केली आहे. 

संसदेच्या अधिवेशनादरम्यान दिल्ली स्थित खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांची कोविड चाचणी दुस-यांदा पॉझिटिव्ह आली. डॉक्टरांच्या सल्ल्याने त्यांच्यावर मुंबईस्थित उपचार सुरु आहेत. स्वतः आजारी असताना श्री. चिखलीकर यांनी पुर परिस्थिती, लंम्पी, कोरोना अशा तिहेरी संकटात सापडलेल्या शेतकरी व सामान्य जनतेला धीर देण्यासाठी एका व्हिडिओच्या माध्यमातून संदेश दिला आहे.

हेही वाचा - हिंगोली : पूल नसल्याने ग्रामस्थ व शेतकऱ्यांना काढावी लागते पाण्यातून वाट

संकटाची मालिका सुरुच 
पुर परिस्थितीमुळे अनेक भागात शेती, घरांचे नुकसान झाले आहे. खरीप हंगामातील सोयाबीन, ज्वारी, कापूस या पिकांची मोठी हानी झाली. काही भागात सोयाबीनला मोड फुटत आहेत. अशा नैसर्गिक आपत्तीत पुन्हा एकदा शेतकरी सापडला आहे. त्यातच पशुधन लंम्पीच्या संसर्गाने त्रस्त झाला आहे. त्यामुळे पशुपालन चिंताग्रस्त झाला आहे. यातच सद्या जिल्ह्यात कोरोनाची वाढती रुग्ण संख्या पाहता समाजमन भयभीत झाले आहे. एकामागून एक संकटाची मालिका सुरुच आहे. तिहेरी संकटावर आपण मात करायची असल्याचे खासदार चिखलीकर यांनी सांगितले.  

हेही वाचलेच पाहिजे - पावसाळ्यापुर्वीची थातुरमातुर कामे पथ्यावर, बारा-बारा तास वीज गुल...

संबंधित यंत्रणेशी संवाद सुरु - चिखलीकर
माझ्या आजारामुळे मी या परिस्थितीत आपल्यापर्यंत येऊ शकलो नाही. परंतु जिल्हाधिकारी यांच्याशी व त्या-त्या तालुक्याच्या तहसीलदार व संबंधित यंत्रणेशी माझा संवाद सुरु आहे. भाजपाचे जिल्हाध्यक्ष, महानगराध्यक्ष, तालुकाध्यक्ष, पदाधिकारी, कार्यकर्ते लोकांच्या मदतीला धावून जात आहेत. मी आपल्या सोबत आहे. असे भावनिक आवाहन करीत जिल्ह्यातील तिहेरी संकटात बोगस उद्घाटन करणा-यांवर त्यांनी शाब्दीक प्रहार केला व जिल्हा प्रशासनाने नुकसानग्रस्त भागाचे पंचनामे करावेत, शेतक-यांना तातडीने मदत द्यावी तसेच कोरोनाबाबत उपचार वेळेत द्यावा, चाचणी रिपोर्ट वेळेवर येत नाहीत, किट उपलब्ध नाहीत अशा तक्रारी आहेत. त्या दूर करुन सगळीकडेच कोरोनाबाबत तत्काळ उपाययोजना कराव्यात, असेही खासदार चिखलीकर यांनी सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Overcoming the triple crisis - MP Chikhlikar, Nanded news