डोडा (अमली पदार्थ) विक्री करणारी टोळी पोलिस दिसताच पसार

प्रल्हाद कांबळे
Saturday, 2 May 2020

नांदेड- शिवाजीनगर पोलिस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाची कारवाई. पावणेदोन लाखाचा मुद्देमाल जप्त. आरोपी मात्र अंधाराचा फायदा घेऊन पसार.

नांदेड : लॉकडाउनमध्ये सर्वत्र मद्याची दुकाने बंद असल्याने डोडा विक्री करणारी टोळी सक्रीय झाली. अशाच एका टोळीवर पाळत ठेवून कारावई केली मात्र पोलिस दिसताच टोळीतील सदस्य मुद्देमाल सोडून पसार झाले. पोलिसांनी डोडाच्या (नशेला पदार्थ) १३ बॉटल आणि सहा दुचाकी असा पावणेदोन लाखाचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई शिवाजीनगर गुन्हे शोध पथकांनी महाराष्ट्र दिनी एलआयसी कार्यालय परिसरात केली.

संबंध जगभरात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाउन व संचारबंदी लावण्यात आली आहे. भारतात देखील तिसरा लॉकडाउन जाहीर करण्यात आला आहे. त्यामुळे बहुतांश लोक आपल्या घरातच आहेत. बाहेर अत्यावश्‍यक दुकाने सोडली तर सर्व बाजारपेठ कडकडीत बंद आहे. त्यातच बीअरबार, मद्य वक्री करणारी दुकाने बंद आहेत. याचा फायदा काही मंडळी घेत असून अवैध मार्गचा अवलंब करत आहेत. चोरीच्या मार्गाने नशेले पदार्थ विक्री करत असल्याची गुप्त माहिती उपविभागीय पोलिस अधिकारी (शहर) अभिजीत फस्के यांना मिळाली. त्यांनी शिवाजीनगर पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक रवी वाहुळ यांना कळविले. 

हेही वाचा Video : नगीनाघाटसह गुरुद्वारा परिसर सील

सहा दुचाकी व डोडा जप्त 

यावरून श्री. वाहुळे यांनी पोलिस निरिक्षक अनंत नरुटे यांच्या मार्गदर्शऩाखाली आपल्या सहकाऱ्यांना घेऊन हिंगोली नाका परिसरातील एलआयसी कार्यालयात सापळा लावला. एक मेच्या रात्री डोडा विक्री करणारी टोळी वेगवेगळ्या सहा दुचाकीवरुन तिथे आली. मात्र त्यांना पोलिस आल्याची चाहुल लागताच त्यांनी सोबत आणलेला डोडा (१३ बॉटल) व दुचाकी तिथेच सोडून पळ काढला. पोलिसांनी त्यांचा पाठलाग केला मात्र ते अंधाराचा फायदा घेत पसार झाले. 

वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांकडून कौतुक

श्री. वाहूळे यांनी घटनास्थळाचा पंचनामा करून सहा दुचाकी व डोडा जप्त करून शिवाजीनगर पोलिस ठाण्यात जमा केला. रविव वाहुळे यांच्या फिर्यादीवरुन शिवाजीनगर पोलिस ठाण्यात अज्ञात टोळीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. तपास पोलिस हवालदार संजय मुंडे करत आहेत. पथकाचे पोलिस अधीक्षक विजयकुमार मगर आणि अतिरिक्त पोलिस अधीक्षक दत्ताराम राठोड यांनी कौतुक केले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Passing a gang selling Doda (drugs) Nanded crime news