Nanded News : नांदेडला फुले - आंबेडकर साहित्य संमेलन ; ‘उपरा’कार लक्ष्मण माने संमेलनाध्यक्ष ,कमलकिशोर कदम यांना जीवनगौरव पुरस्कार

महात्मा फुले - छत्रपती शाहू महाराज - डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांच्या प्रेरणेतून राज्यस्तरीय फुले - आंबेडकर विचारधारा साहित्य संमेलनाचे आयोजन बुधवारी (ता. सात फेब्रुवारी) नांदेडला करण्यात आले आहे.
nanded
nandedsakal

नांदेड : महात्मा फुले - छत्रपती शाहू महाराज - डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांच्या प्रेरणेतून राज्यस्तरीय फुले - आंबेडकर विचारधारा साहित्य संमेलनाचे आयोजन बुधवारी (ता. सात फेब्रुवारी) नांदेडला करण्यात आले आहे. ज्येष्ठ साहित्यिक, विचारवंत ‘उपराकार’ पद्मश्री लक्ष्मण माने (सातारा) साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद भूषविणार असून माजी शिक्षणमंत्री कमलकिशोर कदम यांना फुले - आंबेडकर जीवनगौरव पुरस्काराने सन्मानीत करण्यात येणार आहे.

नांदेडमधील मानव विकास सेवाभावी संस्था आणि राज्य साहित्य व संस्कृती मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने येथील कुसूम सभागृहात सकाळी अकरा वाजता संमेलनाचे उद्‍घाटन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणच्या सचिव तथा न्यायमूर्ती श्रीमती दलजीतकौर यांच्या हस्ते होणार आहे.

nanded
Nanded News : आदिवासी महिला सरपंचासह तिच्या पतीस जातिवाचक शिवीगाळ करत मारहाण

यावेळी नांदेड दक्षिणचे आमदार मोहन हंबर्डे, ज्येष्ठ साहित्यिक प्रा. दत्ता भगत, साहित्य सांस्कृतिक मंडळाचे सदस्य तथा साहित्यिक प्रदीप पाटील (सांगली), कथाकार विलास सिंदगीकर (लातूर), ज्येष्ठ साहित्यिक प्रा. डॉ. जगदीश कदम, ज्येष्ठ कवी प्रा. रविचंद्र हडसनकर आदी मान्यवर उपस्थित राहणार असल्याची माहिती संमेलनाच्या स्वागताध्यक्षा डॉ. मीनल पाटील खतगावकर, निमंत्रक संगीता पाटील डक आणि संयोजक राज गोडबोले यांनी दिली आहे.

संमेलनासाठी संयोजन समितीचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. माधव बसवंते, कार्याध्यक्ष एन.डी. गवळे, सचिव प्रा. किशन गायकवाड, सुभाष सुर्यतळ, नईमखान, डॉ. राम वनंजे, सोपान वाघमारे, प्रभू ढवळे, गौतम खिराडे, विनोद हाटकर, पी.के. खानापूरकर, किशोर नावंदे, राम देवंदे, ऋतिका गोडबोले, यशवंत गिरबीडे, नितीन एंगडे, प्रतिक मोरे आदी परिश्रम घेत आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com