esakal | नांदेडात ‘आयजी’च्या आदेशानंतर अधिकारी लागले कामाला
sakal

बोलून बातमी शोधा

nanded police

नांदेडात ‘आयजी’च्या आदेशानंतर अधिकारी लागले कामाला

sakal_logo
By
अभय कुळकजाईकर

नांदेड: नांदेड परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक निसार तांबोळी यांनी परिक्षेत्रात अवैध धंद्याविरूद्ध कारवाई करण्याचे आदेश दिल्यानंतर पोलिस अधिकारी आणि त्यांचे सहकारी तसेच कर्मचारी खडबडून जागे झाले असून त्यांनी कारवाईला सुरूवात केली आहे. पोलिसांनी तीन जुगार अड्यावर छापा टाकून १३ जणांना पकडले. त्याचबरोबर त्यांच्याकडील जुगाराचे साहित्य, १३ हजार ७३० रुपये रोख आणि दीड लाख रुपयांच्या तीन दुचाकी असा एकूण एक लाख ६३ हजार ७३० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

सांगवी शिवारात आनंदा दशरथ तिडके यांच्या शेतातील मोकळ्या जागेत झोपडीच्या बाजूला उजेडात सोमवारी (ता. २६) रात्री दहाच्या सुमारास पाचजण जुगार खेळताना आणि खेळविताना आढळून आले. पोलिसांनी छापा मारून जुगाराचे साहित्य, रोख आठ हजार ६५० रुपये आणि दीड लाख रुपये किंमतीच्या तीन दुचाकी असा एकूण एक लाख ५८ हजार ६५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याबाबत पोलिस निरीक्षक अनिरूद्ध काकडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून विमानतळ ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस नायक देशमुख करत आहेत.

हेही वाचा: मावेजासाठी नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर काम बंद आंदोलन

शहरातील आंबेडकर नगर भागात कमलबाई किराणा दुकानाच्या समोरील रस्त्यावर सोमवारी (ता. २६) दुपारी दोनच्या सुमारास एकजण विनापरवाना आणि बेकायदेशिररित्या मटका जुगार खेळताना व खेळविताना आढळून आला. त्याच्याकडील जुगाराचे साहित्य आणि रोख दोन हजार ४३० रुपये जप्त करण्यात आले आहेत. याबाबत स्थानिक गुन्हे शाखेचे सलीम बेग यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शिवाजीनगर ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक नरूटे करत आहेत.

हेही वाचा: जालन्यात कोरोना नियंत्रणात पण प्रलंबित चाचण्यांचा प्रश्न कायम

आटकूर (ता. धर्माबाद) येथे मोगलाजी दरमोड यांच्या गोठ्यासमोरील मोकळ्या जागेत मंगळवारी (ता. २७) रात्री अकरा वाजता सात जण मटका जुगार खेळत होते. पोलिसांनी त्यांना अटक करून त्यांच्याकडील दोन हजार ६५० रुपये रोख व जुगाराचे साहित्य जप्त केले. याबाबत धर्माबाद ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून सहायक फौजदार ढवळे पुढील तपास करत आहेत.

loading image
go to top