Nanded Hospital Deaths: नांदेडच्या मृत्यू प्रकरणाचा प्राथमिक अहवाल केंद्राला सादर; भारती पवारांनी दिली महत्वाची अपडेट

आयसीयूच्या बेडमध्ये वाढ करण्यात येणार असून ही संख्या ९ वरुन ८० वर नेण्यात येणार आहे.
Dr. Bharati Pawar on India Corona Update
Dr. Bharati Pawar on India Corona Updateटिम ई सकाळ

नवी दिल्ली : नांदेडमधील शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात गेल्या तीन दिवसांत ३७ जणांचा मृत्यू झाल्यानं खळबळ उडाली होती. या मृत्यूंचा प्राथमिक अहवाल केंद्र सरकारला प्राप्त झाला आहे.

या अहवालानुसार हे सर्व मृत्यू औषधांअभावी झालेले नाहीत, अशी माहिती केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार यांनी दिली आहे. सिव्हिल हॉस्पिटलला भेट दिल्यानंतर त्यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. (Preliminary report of Nanded death case submitted to Centre Imp update given by Bharti Pawar)

Dr. Bharati Pawar on India Corona Update
Nanded Hospital Deaths: नांदेडमधील बालकांच्या मृत्यूला खासगी रुग्णालयेच जबाबदार; मुश्रीफांचा गंभीर आरोप

आयसीयूचे बेड वाढवणार

पवार म्हणाल्या, सिव्हिल हॉस्पिटलला भेट दिल्यानंतर तिथं वैद्यकीय सुविधा मिळतात की नाही, याची परिस्थिती जाणून घेतली. 500 बेडचे हॉस्पिटल आहे. इथं औषधे आहेत की नाही याबाबत माहिती घेतली. इमर्जन्सी रुग्ण किती आहेत याचा आढावा घेतला, त्यानुसार आज 25 रुग्ण आहेत काल 40 होते. इथं आयसीयूचे 9 बेड होते, ते वाढवण्याची गरज होती. त्यानुसार कोरोनात या रुग्णालयाला पॅकेज देण्यात आलं होतं त्यानंतर ते आता 80 बेडचं होईल. यात काही टेक्निकल अडचणी आहेत. (Latest Marathi News)

Dr. Bharati Pawar on India Corona Update
VBA in INDIA Alliance: वंचित बहुजन आघाडी लवकरच इंडिया आघाडीत होणार सामिल? घडामोडींना वेग

खासगी रुग्णालयांतून गंभीर स्थितीत शिफ्ट

या संपूर्ण प्रकरणासाठी चौकशी समिती नेमण्यात आली आहे. ३ ऑक्टोबर रोजी ही समिती नेमली आहे. त्यानुसार ही चौकशी सुरु आहे, काही नवजात बाळं या रुग्णालयात होते ते इमर्जन्सी व्हेंटिलेटरवर असतानाच त्यांना शिफ्ट करण्यात आलं होतं. समिती तर संपूर्ण अहवाल देईलच पण प्राथमिक अहवालानुसार, त्यामध्ये विशेषकरुन पुरेसी औषधं उपलब्ध होती, असंही भारती पवार यांनी सांगितलं आहे. (Marathi Tajya Batmya)

Dr. Bharati Pawar on India Corona Update
Sanjay Singh: मद्य घोटाळ्यात संजय सिंह यांनी कोट्यवधींची माया जमवल्याचे पुरावे?; ईडीचा दावा

प्रकरणाचा दुसरा अहवाल लवकरच येणार

तसेच मृत्यू झालेल्या काही रुग्णांचं वय जास्त होतं. अनेक रुग्ण तर खाजगी रुग्णालयातून दाखल झाले होते. काही नवजात बालक खाजगी रुग्णालयात व्हेंटिलेटरवर होते, ते शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. औषधं नसतील तर मागणी केली जाते, केंद्र सरकार कडून औषध दिली जातात, या मृत्यू प्रकरणांचा दुसरा सविस्तर अहवाल लवकर येईल.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com