Republic Day 2024 : नांदेड येथील दहशतवाद विरोधी पथकाचे प्रमुख पोलिस निरीक्षक माणिक बेंद्रे यांना राष्ट्रपती पदक

पोलिस दलातील गुणवत्तापूर्ण आणि उत्कृष्ट सेवेसाठी नांदेड येथील दहशतवाद विरोधी पथकाचे प्रमुख पोलिस निरीक्षक माणिक बेंद्रे यांना राष्ट्रपती पदक (विशिष्ट सेवा) जाहीर झाले आहे. बेंद्रे हे १९९५ च्या बॅचचे अधिकारी असून १९९९ ते २००२ या काळात गडचिरोली येथे नक्षलवाद विरोधी पथकात त्यांनी उल्लेखनीय काम केले.
police nanded
police nandedsakal

नांदेड : पोलिस दलातील गुणवत्तापूर्ण आणि उत्कृष्ट सेवेसाठी नांदेड येथील दहशतवाद विरोधी पथकाचे प्रमुख पोलिस निरीक्षक माणिक बेंद्रे यांना राष्ट्रपती पदक (विशिष्ट सेवा) जाहीर झाले आहे. बेंद्रे हे १९९५ च्या बॅचचे अधिकारी असून १९९९ ते २००२ या काळात गडचिरोली येथे नक्षलवाद विरोधी पथकात त्यांनी उल्लेखनीय काम केले.

police nanded
Republic Day 2024 : ग्रामीण पोलिस दलातील दोनअधिकाऱ्यांचा गाैरव ; उत्कृष्ट पोलिस सेवेसाठी राष्ट्रपती पदक जाहीर

२००२ ते २००५ मध्ये किनवट येथे तर लातूरला लाचलुचपत प्रतिबंधक विभागात काम केले. २०१२ मध्ये परभणी येथे ‘लष्कर ए तोयबा’ या संघटनेच्या पाच जणांना त्यांनी पकडले. २०१६ मध्ये नांदेड येथे ‘इसिस’मध्ये काम करणाऱ्या चार जणांना पकडण्यात त्यांनी महत्त्वाची कामगिरी बजावली. तसेच तपास पूर्ण करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. या दोन्ही प्रकरणातील संबंधितांना शिक्षा झाली आहे.

‘तत्कालीन वरिष्ठ अधिकारी, सहकारी आणि नांदेडचे पोलिस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांच्या मार्गदर्शनाखाली चांगले काम करता आले. माझ्या २८ वर्षाच्या या गुणवत्तापूर्ण सेवेची दखल घेण्यात घेऊन राष्ट्रपती पदक जाहीर झाले, याचा मनस्वी आनंद होत आहे’ अशी भावना बेंद्रे यांनी व्यक्त केली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com