esakal | विद्यार्थ्यांवरील ताण कमी करण्यासाठी पाठ्यपुस्तकांची फेररचना
sakal

बोलून बातमी शोधा

File photo

करोना वषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी देश लॉकडाउन केला. परिणामी सर्वच शाळा, महाविद्यालये अद्यापही बंदच आहेत. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, त्यांच्यावर अभ्यासाच ताण पडू नये म्हणून केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने पाठ्यपुस्तकांची फेररचना केली आहे.

विद्यार्थ्यांवरील ताण कमी करण्यासाठी पाठ्यपुस्तकांची फेररचना

sakal_logo
By
प्रमोद चौधरी

नांदेड : इयत्ता नववी ते बारावीच्या वर्गाच्या पाठ्यक्रमांना कात्री लावताना केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (सीबीएसई) धर्मनिरपेक्षता, नागरिकत्व, नोटाबंदी व लोकशाही हक्क यासह इतरही अनेक बाबींवरचे धडे पाठ्यपुस्तकातून वगळले आहेत.

यंदाच्या शैक्षणिक वर्षाचे सुरुवातीचे तीन महिने कोरोना महामारीमुळे वाया गेल्यामुळे उरलेल्या वेळात विद्यार्थ्यांवरील ताण कमी करण्यासाठी विविध विषयांच्या पाठ्यक्रमांची त्याअनुरुप फेररचना करून सुमारे ३० टक्के अभ्यास कमी करण्यात येणार असल्याचे केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री रमेश पोखरियाल यांनी मंगळवारी जाहीर केले होते. त्यानुसार नेमक्या कोणत्या इयत्तेचा अभ्यासक्रम कशा प्रकारे कमी करण्यात आला आहे, याचा तपशील सीबीएसईने बुधवारी जाहीर केला आहे. 

हेही वाचा - कोरोना ब्रेकिंग - नांदेडला दिवसभरात ३० पॉझिटिव्ह; एकाचा मृत्यू

मंडळाच्या अशा आहेत सूचना
पाठ्यक्रमातील हा बदल फक्त यंदापुरताच लागू असेल, असे मंडळाने स्पष्ट केले आहे. मंडळाच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, वगळलेले धडे वर्गात न शिकविता गरज असेल तेव्हाच त्यांचा संदर्भ देण्यात यावा. वर्षभरात शाळांमध्ये घेतल्या जाणाऱ्या परीक्षा किंवा वर्ष अखेरीस मंडळातर्फे घेतल्या जाणाऱ्या परीक्षेत या वगळलेल्या भागावर प्रश्न विचारण्यात येणार नाहीत, असे शाळाप्रमुख व शिक्षकांना कळविण्यात आले आहे.

हे देखील वाचाच - ‘लक्ष्मी’च्या लग्नाकरिता ‘साईप्रसाद’ची मदत
 

का केली पाठ्यपुस्तकांची फेररचना?
शिक्षणातील ज्ञानार्जनाचे महत्त्व लक्षात घेता पाठ्यक्रम कमी केला तरी विषयांमधील मूलभूत संकल्पना कायम ठेवण्याची काळजी घेण्यात आल्याचे सांगितले जात होते. मात्र, कोरोनामुळे निर्माण झालेल्या अभूतपूर्व परिस्थितीचे कारण देऊन पाठ्यक्रमाचा फेरआढावा करताना या सरकारच्या काळात ज्या मुद्यांवरून आंदोलने व वाद झाले, असेच विषय नेमके वगळले जावेत, यावरून अनेकांच्या भुवया साहजिकच उंचावल्या आहेत. मंत्र्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत या पाठ्यक्रम कपातीच्या संदर्भात शिक्षणतज्ज्ञांनी म्हणे एक आठवड्यात दीड हजाराहून जास्त सूचना व शिफारशी पाठविल्या होत्या. मात्र, नेमके हेच धडे वगळण्याच्या सूचना कोणाच्या होत्या? हे मात्र कळायला मार्ग नाही.

येथे क्लिक कराच - गेले होते वऱ्हाडी म्हणून; पण काढावा लागला पळ ​

नेमके काय वगळले
इयत्ता दहावी :
 लोकशाही आणि विविधता, लैंगिक समता, धर्म व जात, लोकचळवळी व आंदोलने आणि लोकशाही पुढील आव्हाने
इयत्ता ११ वी : संघराज्य व्यवस्था, नागरिकत्व, धर्मनिरपेक्षता व स्थानिक स्वराज्य संस्थांचे महत्त्व आणि विकास.
इयत्ता १२ वी : पाकिस्तान, म्यानमार, बांगलादेश, श्रीलंका व नेपाळ या शेजारी देशांशी भारताचे संबंध, भारताच्या आर्थिक विकासातील परिवर्तने, भारतातील सामाजिक चळवळी आणि नोटाबंदी.