नांदेडचे रस्ते झाले असुरक्षीत, लुटमारीच्या घटना वाढल्या

file photo
file photo

नांदेड : लाॅकडाउनमध्ये अनेकांच्या हातचा रोजगार गेल्याने काही जण गुन्हेगारीकडे वळले. रस्त्यात अडवून खंजरचा धाक दाखवून किंवा माराहण करुन लुटणारी टोळी सक्रीय झाली आहे. मागील काही दिवसात वाटमारीच्या घटना वाढीस लागल्या असून नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. जिल्ह्यात वाटमारीच्या तीन घटना घडल्या असून त्याप्रकरणी विविध पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहे.  

ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुन्हेगारांचे वर्चस्व वाढले असून दोघांवर तिघांनी खंजरने हल्ला करून लुटण्याच्या घटना घडल्या. लूटमार करणारे हे दुचाकीस्वार होते. तसेच लोहा तालुक्यातील मारतळा येथील ट्रान्सपोर्टमध्ये काम करणारा लातूर शहरातील अरबाज नूरखा शेख हा ता. १८ जुलै रोजी आपल्या दुचाकी (एमएच २६ २३४७) वरून एमआयडीसीमधून मारतळाकडे जात होता. तो रात्री दहा वाजताच्या सुमारास या मार्गावरील जय महाराष्ट्र धाब्यासमोर आला असता पाठीमागुन दुसऱ्या दुचाकीवर आलेल्या तीन अज्ञात चोरट्यांनी त्याला अडवून गालावर थाप्पड मारून खंजरने वार करून  जखमी केले. यावेळी त्याच्या खिशातील नगदी पाच हजार रुपये व मोबाइल असा १३ हजार रुपये किंमतीचा ऐवज चोरून नेला. यावेळी अरबाजखानचामित्र सोडविण्यासाठी पुढे आला असता त्याच्यावरही खंजरने वार करून जखमी केले.

नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात अनोळखी चोरट्यांविरुद्ध जबरी चोरीचा गुन्हा

दुसऱ्या घटनेत ता. १७ जुलै रोजी याच चोरट्यांनी जवाहरनगर परिसरातील कॅनॉल रोड वरून उत्तम चांदु वाघमारे राहणार बळीरामपुर याला मारहाण करुन त्यांच्याकडील नगदी दहा हजार रुपये मतदान कार्ड असलेली बॅग जबरीने चोरून नेली होती. या घटनेत तो जखमी झाला होता. या प्रकरणी अरबाज याच्या फिर्यादीवरुन नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात अनोळखी चोरट्यांविरुद्ध जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास पोलिस निरीक्षक प्रशांत देशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक श्री कासले करीत आहेत.

परीक्षेच्या तणावातून विद्यार्थिनीची आत्महत्या

हदगाव : नीट परीक्षा कधी होणार या विचाराने अभ्यासाचा ताण घेऊन एका विद्यार्थिनीने आत्महत्या केल्याची घटना हदगाव शहरात ता. १८ जुलै रोजी घडली आहे. कोरोना प्रादुर्भावामुळे विद्यार्थ्यांसमोर परिक्षेचा निकाल व शाळा कधी सुरू होणार असा प्रश्न उपस्थित होत आहे. दरम्यान असाच एक प्रकार हदगाव शहरातील आयोध्यानगर येथील रहिवासी अनुष्का संतोष देशमुख (वय १९) या विद्यार्थिनीला पडला आणि अभ्यासाचा ताण घेत नीट परीक्षा कधी होणार या विचारात तिने ता. १८ जुलै रोजी पहाटे आपल्या राहत्या घरी ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केली. याप्रकरणी बापूसाहेब देशमुख यांच्या माहितीवरून हदगाव पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

एक लाखाची घरफोडी 

बाऱ्हाळी : घराला कुलूप लावून शेतीकामाला गेलेल्या शेतकऱ्यांच्या घरात शिरुन अज्ञात चोरट्याने दिवसाढवळ्या चांदीचे दागिणे व रोख रक्कम असा एक लाख रुपयाचा ऐवज चोरून नेल्याची रविवारी (ता. १९ ) घटना घडली आहे. शिवाजी पर्वतराव कल्पे (वय ४५) हे नेहमीप्रमाणे शनिवारी शेतीच्या कामासाठी आपल्या घराला कुलूप लावून कुटुंबासह शेतावर गेले होते. याची माहिती ठेवून अज्ञात चोरट्यांनी भरदिवसा घरात प्रवेश करुन रॅाडने कपाटफोडून एक लाखाचा ऐवज लंपास केला.  शिवाजी कल्पे यांच्या फिर्यादीवरुन मुक्रमाबाद पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुक्रमाबाद ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक कमलाकर गडीमे, फौजदार गोपीनाथ वाघमारे यांनी नांदेड येथून श्वानपथक  पाचारण करून तपासाची चक्रे जलद गतीने फिरून एका संशयिताला ताब्यात घेतले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com