शेतकऱ्यांच्या खात्यात 'एफआरपी' चे 8299 कोटी जमा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Farmer
शेतकऱ्यांच्या खात्यात 'एफआरपी' चे 8299 कोटी जमा

शेतकऱ्यांच्या खात्यात 'एफआरपी' चे 8299 कोटी जमा

माळीनगर : चालू गळीत हंगामात राज्यातील साखर कारखान्यात (Sugar factory) 31 डिसेंबरअखेर गाळप झालेल्या ऊसाच्या एफआरपीचे 8 हजार 299 कोटी रुपये (85 टक्के) शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले आहेत.एफआरपीचे (FRP)1 हजार 465 कोटी रुपये (15 टक्के) थकीत आहेत.साखर आयुक्तालयाकडून याबाबतची माहिती मिळाली.राज्यात उभारणी झालेले 136 सहकारी व 110 खाजगी मिळून एकूण 246 साखर कारखाने आहेत.मागील हंगामात त्यापैकी सहकारी व खाजगी प्रत्येकी 95 मिळून 190 कारखाने कार्यरत होते.

हेही वाचा: पुणे : कोरोना बाधित ८० टक्क्यांहून अधिक रुग्णांचे घरीच विलगीकरण

उभारणी झालेल्या सहकारी साखर कारखान्यांची प्रतिदिन गाळप क्षमता 5.18 व खाजगी कारखान्यांची 4.10 लाख टन अशी एकूण दैनंदिन गाळप क्षमता 9.28 लाख टन इतकी आहे.स्थापित गाळप क्षमतेपैकी कार्यरत सहकारी साखर कारखान्यांची गाळप क्षमता 4.18 तर खाजगी कारखान्यांची 3.87 लाख टन मिळून एकूण 8.05 लाख टन आहे.यंदाच्या हंगामात राज्यात एकूण 12.32 लाख हेक्टर क्षेत्रावर ऊस गाळपासाठी उपलब्ध आहे.त्यातून एक हजार 96 लाख टन ऊस गाळप होण्याची शक्यता आहे.सरासरी साखर उतारा 11.20 टक्के मिळून राज्यात यावर्षी 122 लाख टन साखर उत्पादन होण्याचा अंदाज आहे.

हेही वाचा: माईंच्या जाण्याने हजारोंचे मातृछत्र हरपले ; प्रभाकर देशमुख

त्यापैकी सुमारे 10 ते 12 लाख टन उत्पादन इथेनॉल निर्मितीकडे वळण्याची शक्यता आहे.चालू हंगामात सहकारी व खाजगी प्रत्येकी 101 मिळून एकूण 202 कारखान्यांनी गाळप परवान्यासाठी अर्ज दाखल केले होते.त्यापैकी 94 सहकारी व 96 खाजगी अशा 190 कारखान्यांना साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी गाळप परवाना दिला आहे.यंदाच्या मोसमात दोन जानेवारीअखेर एकूण 189 कारखान्यांनी गाळप सुरू केले असून 489.50 लाख टन ऊस गाळप होऊन 47.55 लाख टन साखर उत्पादन झाले आहे.दैनंदिन साखर उतारा 10.90 टक्के इतका आहे.हंगामातील सरासरी साखर उतारा इथेनॉल डायव्हर्जन वगळून 9.71 टक्के आहे.

हेही वाचा: महापुरुषांच्या पुतळे निर्मितीचे बेळगाव बनतंय ‘हब’

31 डिसेंबर अखेरची एफआरपीची फॅक्ट फाईल-

  • गाळप हंगाम घेतलेले कारखाने - 186

  • झालेले एकूण गाळप - 343.58 लाख टन

  • एकूण देय एफआरपी (तोडणी वाहतुकीसह) - 11145 कोटी

  • करारानुसार देय एफआरपी (तोडणी वाहतुकीसह) - 9752 कोटी

  • तोडणी वाहतुकीसह दिलेली एफआरपी - 8299 कोटी

  • थकीत एफआरपी - 1465 कोटी

  • 100 टक्के एफआरपी दिलेले कारखाने - 76

  • एफआरपी थकीत असलेले कारखाने - 110

  • मागील हंगामातील थकीत एफआरपी - 594 कोटी

Web Title: 8299 Crore Of Frp In Farmers Accounts

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top