esakal | धक्कादायक : जिल्ह्यातील ‘या’ ठाणेदारालाच बघुन घेण्याची धमकी...
sakal

बोलून बातमी शोधा

file photo

एकाने धमकी देऊन शासकिय कामात अडथळा निर्माण करणाऱ्याविरूद्ध तामसा पोलिस ठाण्‍यात बुधवारी (ता. १३) सायंकाळी गुन्हा दाखल करण्यात आला. 

धक्कादायक : जिल्ह्यातील ‘या’ ठाणेदारालाच बघुन घेण्याची धमकी...

sakal_logo
By
प्रल्हाद कांबळे

नांदेड : तामसा (ता. हदगाव) बसस्थानक परिसरात थांबलेल्या नागरिकांना घरी जाण्याची विनंती करणाऱ्या ठाणेदारालाच त्यातील एकाने धमकी देऊन शासकिय कामात अडथळा निर्माण करणाऱ्याविरूद्ध तामसा पोलिस ठाण्‍यात बुधवारी (ता. १३) सायंकाळी गुन्हा दाखल करण्यात आला. 

तामसा येथील ठाणेदार नामदेव मद्दे हे आपल्या हद्दीत कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी घराबाहेर पडणाऱ्या नागरिकांना घरी जाण्याचा सल्ला देत होते. तामसा बसस्थानक परिसरात तर नागरिकांचा घोळका दिसल्याने त्यांना घरी जाण्याची त्यांनी विनंती केली. तसेच तोंडाला कोणत्याही प्रकारचा मास्क न वापरता संसर्गजन्य रोग पसरविणारी कृती करीत असतांना मिळून आले. त्यांना घराकडे जा असे म्हणताच आम्हाला घरी जा म्हणणारे तुम्ही कोण असा उफराटा प्रश्‍न विचारुन तुम्हाला काय अधिकार आहेत असे म्हणून त्यांना धमकी दिली. तुमची तर बघुन घेतो अशी धमकी देत शासकिय कामात अडथळा निर्माण केला. 

हेही वाचा - Video - Corona : अशाही काळात हिंमत सोडायची नाही- डाॅ. केशव देशमुख

निळकंठ मुकिंदराव कल्याणकर रा. तामसा याच्यावर गुन्हा 

पोलिसांसोबत वाद घालून वातावरण दुषीत करण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन तामसा पोलिस ठाण्यात हजर केले. तामसा पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक नामदेव मद्दे यांच्या फिर्यादीवरुन विविध कलमान्वये निळकंठ मुकिंदराव कल्याणकर रा. तामसा (ता. हदगाव) याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सहाय्यक पोलिस निरीक्षीक श्री. मद्दे करत आहेत. 

एक्साईजच्या पथकाने कासारखेडा येथून १५ हजाराची देशी दारु जप्त केली

नांदेड : राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या किनवट (ब) कार्यक्षेत्रात येणाऱ्या कासारखेडा (ता. अर्धापूर) येथे कारवाई करुन १५ हजाराची देशी दारु जप्त केली. मात्र उत्पादन शुल्क विभागाचे पथक दिसताच दारु विक्री करणारे दोघेजण पसार झाले. त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई निरीक्षक एस. एम. बोदमवाड यांच्या पथकाने बुधवारी (ता. १३) केली.
 
जिल्हाभरात धडक कारवाईचे सत्र सुरू

कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी जिल्हाभरात लॉकडाउन सुरू आहे. या लॉकडाउनचा फायदा घेत काळ्या बाजारात अवैध मार्गाने देशी दारु विक्री करणारे ग्रामिण भागात रस्त्याच्या कडेला दबा धरुन बसून आपला गोरखधंदा करत आहेत. अशा लोकांवर जिल्हाभरात धडक कारवाईचे सत्र सुरू आहे. 

१५ हजाराची देशी दारु जप्त 

राज्य उत्पादन शुल्क विभागाचे जिल्हा अधीक्षक निलेश सांगडे यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक एस. एम. बोधमवाड यांचे पथक अर्धापूर तालुक्यात बुधवारी (ता. १३) गस्त घालत होते. यावेळी त्यांना मिळालेल्या माहितीवरुन पथकानी कासारखेडा परिसरात जावून कारवाई केली. मात्र पथक दिसताच देशी दारु विकणारे जावेदखान रसुलखान पठाण रा. कासारखेडा आणि लक्ष्मण राऊत रा. नांदेड हे दोघेजण मुद्देमाल तिथेच सोडून पसार झाले. पथकानी घटनास्थळावरून ९० मीलीच्या ५०० बॉटल्स (१५ हजार) जप्त केली. 

येथे क्लिक कराआपके पास मै पाणीपुरी खाने को आऊंगा...

पथकात यांचा आहे समावेश

एस. एम. बोधमवाड यांच्या फिर्यादीवरुन राज्य उत्पादन शुल्क विभागात जावेदखान पठाण आणि लक्ष्मण राऊत यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. या पथकात वाय एस. लोळे, के. के. किरतवाड,  बालाजी पवार, जी. व्ही. भालेराव, आर. बी. फाळके, आर. एस. बोधमवाड यांचा सहभाग होता. तपास जवान बालाजी पवार करत आहेत.