esakal | शेतकऱ्याच्या आत्महत्येसह नांदेड जिल्ह्यात सहा जणांचा मृत्यू
sakal

बोलून बातमी शोधा

नांदेड जिल्ह्यात विविध घटनांत सहा जणांचा मृत्यू

शेतकरी आत्महत्येसह नांदेड जिल्ह्यात सहा जणांचा मृत्यू

sakal_logo
By
प्रल्हाद कांबळे

नांदेड : सततची नापिकी व बँकेच्या कर्जास कंटाळून एका शेतकऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना नायगाव तालुक्यातील गडगा शिवारात ता. 14 जून रोजी उघडकीस आली. या घटनेसोबतच जिल्हाभरात विविध घटनांत पाच जणांचा मृत्यू झाला आहे. यात एका मामा- भाचीचाही समावेश आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की ता. 13 जूनच्या रात्री आठपासून ते ता. 14 जूनच्या सकाळी आठ वाजेपर्यंत घरातून बेपत्ता झालेला शेतकरी अशोक लक्ष्मण टाकळीकर (वय ३५) रा. टाकळी थडी ता. बिलोली याने गडगा ता. नायगाव शिवारातील गणेश मुनगलीवार यांच्या शेतातील लिंबाच्या झाडाला गळफास घएऊन आत्महत्या केल्याचे आढळून आले. अशोक लक्ष्मण टाकळीकर याने सततच्या नापिकी व कर्जास कंटाळून आत्महत्या केल्याचे सांगण्यात आले. आनंदराव पाटील यांच्या माहितीवरुन नायगाव पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तपास फौजदार श्री बाचावार करत आहेत.

हेही वाचा - अर्धापूर ग्रामीण रुग्णालयाच्या ईमारतीचे बांधकाम पूर्ण; प्रतिक्षा उद्घाटनाची

गळफास घेऊन आत्महत्या

दुसऱ्या घटनेत इस्लापूर पोलिस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या कोसमेट (ता. किनवट) शिवारात दिगंबर नागोराव पाटील यांच्या शेतात विठ्ठल मैसाजी देवकत्ते (वय 46) राहणार तळ्याचीवाडी, तालुका किनवट याने कुठल्यातरी कारणावरुन चिंचेच्या झाडाला गळफास घेऊन ता. १२ जून ते ता. १४ जूनच्या दरम्यान आत्महत्या केली. दादाराव देवकत्ते यांच्या माहितीवरुन इस्लापूर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून तपास सहायक फौजदार श्री निवळे करत आहेत.

तिसऱ्या घटनेत विषारी साप चावल्याने मृत्यू

कंधार तालुक्यातील शेकापूर येथे राहणारा व मूळचा टेळकी तालुका लोहा येथील मुंजाजी धोंडीबा जिंकलवाड (वय 45) हा शेतात काम करत असताना त्याच्या डाव्या हाताच्या मनगटाला सापाने ता. १३ जून रोजी चावा घेतला. त्याला सरकारी दवाखाना कंधार येथे दाखल केले होते. परंतु त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. नामदेव धोंडिबा जिंकलवाड यांच्या माहितीवरुन कंधार पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तपास पोलिस नाईक टाकरस करत आहे.

येथे क्लिक करा - 'आपलं खडकवासला' सेल्फी पॉईंटचं काल उद्दघाटन अन् आज तोडफोड

विषारी औषध पिऊन आत्महत्या

रामेश्वर शेषराव होनराव (वय 30) राहणार मरशिवणी, तालुका कंधार याने कोणत्यातरी कारणावरुन ता. २२ मे २०२१ रोजी विष प्राशन करुन आत्महत्या केली. पोलिस नाईक डब्लू. के. कांबळे यांच्या माहितीवरुन कंधार पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तपास पोलिस नाईक श्री. पत्रे करत आहेत.

विष्णुपूरी प्रकल्पात मामा- भाचीचा बुडून मृत्यू

विष्णुपूरी काळेश्वर प्रकल्पामध्ये मामा बुद्धप्रेम पांडुरंग कीर्तने (वय ३८) राहणार मुकुंदवाडी, तालुका जिल्हा औरंगाबाद आणि त्याची भाची सांची चंद्रकांत बनसोडे (वय सोळा) राहणार वसरणी तालुका जिल्हा नांदेड हे काळेश्वर येथे गेले होते. ता. १३ जून रोजी सायंकाळी सहाच्या सुमारास ते सेल्फी काढण्याच्या नादात पाण्यात पडले. दोघेही बुडत असल्याचे तेथील काही तरुणांच्या लक्षात आले. यावेळी त्यांनी उड्या मारुन त्यांना वाचविण्याचा प्रयत्न केला. दोघांनाही बाहेर काढून लगेच विष्णुपूरीच्या शासकिय रुग्णालयात दाखल केले. मात्र त्यांच्या उपचार सुरु होण्यापूर्वीच मृत्यू झाला. राहुल पांडुरंग कीर्तने यांच्या माहितीवरुन नांदेड ग्रामीण पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तपास हवालदार श्री भोसले करत आहेत.

loading image