नांदेड विभागात ऊस गाळपाला गती; वीस कारखाने सुरू

file photo
file photo

नांदेड - नांदेड विभागातील चार जिल्ह्यात सध्या उसाच्या गाळपाला गती आली आहे. आठ सहकारी व १२ खासगी अशा एकूण वीस कारखान्यांनी आजपर्यंत १३ लाख ७३ हजार टन उसाचे गाळप केले आहे. तर दहा लाख ६७ हजार १३० क्विंटल साखरेचे उत्पादन झाले आहे. विभागाचा साखर उतारा ७.७७ टक्के असल्याची माहिती प्रादेशीक सहसंचालक (साखर) कार्यालयातून देण्यात आली.
 
नांदेड प्रादेशिक सहसंचालक (साखर) कार्यालयांतर्गत नांदेडसह परभणी, हिंगोली व लातूर या चार जिल्ह्यातून गाळप हंगाम २०२० - २०२१ साठी २६ कारखान्यांनी ऑनलाइन अर्ज केले होते. यात १७ खासगी तर नऊ सहकारी साखर करण्यांचा समावेश होता. आजपर्यंत २० कारखान्यांनी गाळप सुरु केले आहे. यात आठ सहकारी तर १२ खासगी कारखान्याचा समावेश आहे. या कारखान्यांनी गुरुवारअखेर (ता. तीन) १३ लाख ७३ हजार ४५ टन उसाचे गाळप केले आहे. तर दहा लाख ६७ हजार १३० क्विंटल साखरेचे उत्पादन झाले आहे. विभागाचा सरासरी साखर उतारा ७.७७ टक्के असल्याची माहिती साखर सहसंचालक कार्यालयाच्या सुत्रांनी दिली.

हे आहेत सुरु झालेले कारखाने
गाळप सुरु केलेल्या कारखान्यात नांदेड जिल्ह्यातील हडसणी येथील सुभाष शुगर, कुंटूरकर शुगर्स लिमीटेड कुंटूर, व्यंकटेश्वरा शुगर लि. शिवणी, भाऊराव चव्हाण सहकारी साखर कारखाना देगाव, शिवाजी सर्व्हिस स्टेशन बाऱ्हाळी, एमव्हीके शुगर वाघलवाडा या कारखान्यांचा समावेश आहे. तर हिंगोलीमधील भाऊराव चव्हाण सहकारी साखर कारखाना युनीट क्रमांक दोन, पूर्णा सहकारी साखर कारखाना लि. वसमत, कपिश्वर शुगर लि. बाराशिव, शिऊर साखर कारखाना लि. वाकोडी. परभणी जिल्ह्यातील बळीराजा साखर कारखाना कानखेड, योगेश्वरी शुगर लि. लिंबा, रेणुका शुगर लि. पाथरी, टेन्वटीवन शुगर लि. सायखेडा, त्रिधारा शुगर लि. अमडापूर हे कारखाने सुरु झाले आहेत. तर लातूर जिल्ह्यातील विकास सहकारी साखर कारखाना लि. लातूर, विकास सहकारी साखर कारखाना युनीट क्र. दोन, सिद्धी शुगर लि., मांजरा सहकारी साखर कारखाना विलासनगर, साइबाबा शुगन लिमिटेड, हे कारखाने सुरु झाले आहेत.

कारखानानिहाय ऊस गाळप व साखर उत्पादन
(गाळप टनात साखर उत्पादन क्विंटलमध्ये)
जिल्हा...कारखाने...ऊस गाळप...साखर उत्पादन
नांदेड...सहा...३,०३,८००...२,३३,७५०
लातूर...पाच...३,९४,३१०...२,९७,६९०
परभणी...पाच...४,१०,२१७...३,१४,२४०
हिंगोली...चार...२,६४,७१८...२,२१,४५०
एकूण...२०...१३,७३,०४५...१०,६७,१३०
विभागाचा साखर उतारा : ७.७७ टक्के. 

 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com