
देशात शालेय स्तरावर स्काऊट गाईड सारख्या संस्कार घडविणाऱ्या शैक्षणिक उपक्रमाची ओळख आहे. त्यानिमित्ताने समाजातील सर्व स्थरापर्यंत ही चळवळ पोहचावी आणि समाजभिमुख आणि लोकप्रिय व्हावी हा उद्देश.
नांदेड : जगात कोव्हीड-19 या महामारीच्या प्रार्दुभावामुळे उध्दभावलेल्या संकटावर मात करत आपण ऑनलाईन शाळा सुरु केल्यात. या काळात स्काऊट गाईडने सुध्दा मदत, सेवाकार्य, जनजागृती केले. त्यामुळे शुक्रवारी (ता. सात) नोव्हेंबर भारत स्काऊटस् आणि गाईडस् राष्ट्रीय चळवळीच्या स्थापना दिनचे औचित्य साधून मुलांना मूल्याधारित नैतिक शिक्षण देण्यासाठी देशात शालेय स्तरावर स्काऊट गाईड सारख्या संस्कार घडविणाऱ्या शैक्षणिक उपक्रमाची ओळख आहे. त्यानिमित्ताने समाजातील सर्व स्थरापर्यंत ही चळवळ पोहचावी आणि समाजभिमुख आणि लोकप्रिय व्हावी हा उद्देश.
लॉर्ड बेडन पॉवेल यांनी 1907 साली इंग्लंडमध्ये स्काऊट गाईडची चळवळ सुरु केली. भारतात ही चळवळ 1909 साली सुरु झाली. पुणे, बेंगलोर, जबलपूर, सिमला इत्यादी ठिकाणी स्काऊट ट्रुप सुरु करण्यात आले. ही चळवळ अराजकीय, निधर्मी, सर्वधर्मसमभावाची भावना जोपासणारी, गणवेशधारी तरुणांची जागतिक आंतरराष्ट्रीय चळवळ आहे. जवळजवळ जगातील 200 देशात या चळवळीचे कार्य प्रभावीपणे चालु आहे. चीफ स्काऊट लॉर्ड बेडन पॉवेल व लेडी बेडन पॉवेल यांनी 1921 मध्ये भारतात स्काऊट गाईड चळवळीच्या कामाकरिता प्रथम भेट दिली. स्वातंत्र्यपुर्व काळात भारतात इंडियन बॉय स्काऊट, सेवा समिती स्काऊट, नॅशनल स्काऊट असोसिएशन, गर्ल गाईड असोसिएशन अशा विविध संस्था स्वतंत्रपणे कार्यरत होत्या.
हेही वाचा - हिंगोली : प्रचारासाठी वापरण्यात येणाऱ्या वाहनावर पक्ष प्रचाराचे कापडी फलक, झेंडे लावण्यास प्रतिबंध
या संस्थेच्या शाखा भारतातील सर्व राज्यात आहेत
भारतातील या सर्व स्काऊट गाईड संस्थेचे स्वतंत्र भारताचे पहिले शिक्षणमंत्री मौलाना अब्दुल कलाम आझाद, शिक्षण सचिव, नवी दिल्ली. डॉ. ताराचंद्र , डेप्युटी प्रायव्हेट सेक्रेटरी कमांडर जी. एच. निकोलस, पंडीत मदन मोहन मालवीय, पंडीत ह्रदयनाथ कुंझरु व पंडीत श्रीराम वाजपेयी यांच्या प्रयत्नाने एकीकरण करुन ता. सात नोव्हेंबर 1950 मध्ये भारत स्काऊटस् आणि गाईडस् ही संस्था राष्ट्रीय पातळीवर अस्तित्वात आली. नांदेड जिल्ह्याचे माजी गृहमंत्री कै. शंकररावजी चव्हाण हे भारत स्काऊटस् आणि गाईडस् राष्ट्रीय संस्थेचे दिर्घकाळ राष्ट्रीय अध्यक्ष होते. संपुर्ण भारतामध्ये स्काऊट आणि गाईडचे शिक्षण देणारी ही एकमेव संस्था आहे. या संस्थेच्या शाखा भारतातील सर्व राज्यात आहेत. केंद्रीय विद्यालय समिती, नवोदय विद्यालय समिती व रेल्वे विद्यालय समिती यांनाही राज्याचा दर्जा देण्यात आला आहे. स्काऊट गाईड चळवळीचे जनक लॉर्ड बेडन पॉवेल यांना जगातील सर्व स्काऊट गाईड बी. पी. या आवडत्या नावाने ओळखतात. लष्करामध्ये सेवा करीत असतांना स्वकर्तृत्वावर कॅप्टन, मेजर, जनरल या दर्जाच्या पदावर त्यांनी नेत्रदिपक कार्य केले.त्यामुळे ते जनतेच्या दृष्टीने एक मोठे वीर पुरुष ठरले. त्यांनी मुलांसाठी “स्काऊटींग फॉर बाईज ” हे पुस्तक आणि लष्करातील लोकांकरीता “एडस् टू स्काऊटींग ” हे पुस्तक लिहीले. या चळवळीमधून चारित्र्य, स्वावलंबन, आरोग्य व सेवा या मूल्याची जोपासना करुण मुला- मुलींच्या अंगी असलेल्या नेतृत्व गुणाचा विकास, चारित्र्य संवर्धन, आरोग्य, खिलाडूवृत्ती व सेवाभाव निर्माण करुण देशाचे उत्तम नागरिक घडावे हा या शिक्षणाचा उद्देश आहे.
येथे क्लिक करा - नांदेड परिक्षेत्रातील अवैध धंदे बंद करा- पोलिस अधिकाऱ्यांना निसार तांबोळींच्या सुचना -
संस्कारक्षम वयात राष्ट्रीय एकात्मता ,श्रममूल्य सामाजिक बांधिलकी जोपासणारी
मुलांबद्दल आत्मीयता व प्रेम असणारी मोजकीच माणसे होऊन गेलीत त्यापैकी लॉर्ड बेडन पॉवेल हे एक होते.त्यांनी 1907 मध्ये केवळ 20 मुलांना घेऊन इंग्लंड येथे या शिक्षणाची सुरुवात केली . स्काऊट गाईड चळवळ चारित्र्य हस्तव्यवसाय आरोग्य व सेवा या चार मूलभूत अधारस्तंभावर आधारलेली आहे. आज या गुणाची देशाला सुजाण नागरिक घडविण्यासाठी नितांत गरज आहे. 3 ते 25 वयोगटातील मुलामुलींसाठी खेळ, गाणी , गोष्टी, शैक्षणिक कार्यक्रम , गाठी बांधणे, प्रथमोपचार विविध उपक्रम, प्रकल्प, संघनायक प्रशिक्षण शिबीर, तालुका, जिल्हा, राज्य , राष्ट्रीय , आंतरराष्ट्रीय मेळावे व जांबोरी असे चार भिंती बाहेरचे खरे आनंददायी शिक्षण देणारी तसेच संस्कारक्षम वयात राष्ट्रीय एकात्मता ,श्रममूल्य सामाजिक बांधिलकी जोपासणारी जगातील सर्वात मोठी शैक्षणिक चळवळ असून त्याला पुरक असा स्काऊट गाईडचा अभ्यासक्रम आहे. वयाच्या 13 व 14 व्यावर्षी राज्य पुरस्कार व राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त करता येतो प्रवेश ते तृतीय सोपान अभ्यासक्रमाच्या पायऱ्या स्काऊट गाईड विद्यार्थ्यांना ज्ञानाच्या अजोड बाजुंसाठी मजबूती तर देतातच शिवाय छंदाकडून चरितार्थाकडे नेण्यास पूरकही ठरतात. त्यामुळे स्काऊट गाईड शिक्षण हे मुलांमुलींसाठी एक मुक्तव्यासपीठ आहे.