‘गाव तेथे एसटी बस’ची ओळख पुसली...

ग्रामीण भागात मोठी गैरसोय; जनतेला एसटी बसची प्रतीक्षा
 ST worker
ST workersakal

नांदेड : ग्रामीण भागातील नागरिकांची जीवनवाहिनी असलेल्या एसटी बसची चाके थांबलेली आहे. संपाच्या तीन महिन्याच्या काळात गावात एकही एसटी बस धावली नसल्याने गाव तिथे एसटीची ओळख पुसली आहे. संपापूर्वी संपूर्ण जिल्ह्यात एसटी धावत होती. आज केवळ काही मार्गावर एसटी धावत असून त्याची टक्केवारी नगण्यच आहे. परिणामी ग्रामीण भागातील प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे.

जनसामान्यांसाठी रस्ता तिथे एसटी अशी उपलब्धी असलेल्या महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळची रस्ता तिथे एसटी सध्या पोहोचत नसल्याची स्थिती आहे. जिल्ह्याची सध्या ही परिस्थिती असल्याने गावातील नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. बहुतेक गावातील नागरिकांना एसटीच्या बस शिवाय दुसरा पर्याय नाही. परिवहनाचे दुसरे कुठलेही साधन नसल्याने शाळेतील विद्यार्थी तसेच गावकरी एसटीची मोठी आतुरतेने वाट पाहतात. मात्र, गेल्या तीन महिन्यांपासून गावापर्यंत एसटी पोहोचलेली नाही.

एसटीचे शासनात विलीनीकरण करावे, या मागणीसाठी जवळपास तीन महिन्यापासून कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. अशा स्थितीत खासगी व काही मोजक्याच चालकांच्या बळावर एसटी रस्त्यावर धावत आहे. या बस तालुका व जिल्हास्तरावर धावत असल्याने केवळ शहरी भागातील प्रवाशांनाच याचा फायदा होत आहे. ग्रामीण भागातील प्रवाशांची गैरसोय होत असून एसटी जिल्ह्यातील ग्रामीण भागासाठी पूर्णपणे बंद आहे. त्यामुळे गाव तेथे एसटीची ओळख नामशेष झाल्याचे वास्तव आहे. नांदेड स्थानकावरून सद्यस्थितीत २९ साधी बस धावत असून, ती ठरावीक मार्गावरच आहे. हिरकणी, शिवशाही तसेच स्पील या बस अद्यापही बंदच असल्याने प्रवाशांनी खासगी वाहनापेक्षा रेल्वेच्या प्रवासाला पसंती देत असल्याने सर्व रेल्वे हाऊसफुल्ल झाल्या आहेत. परिणामी प्रवाशांना नाईलाजाने खासगी बसचा आधार घ्यावा लागत आहे.

तालुका एकूण सध्या

  • बसेस - सेवेत - बसेस

  • नांदेड - १२४ - १०

  • भोकर - ५७ - एक

  • किनवट - ५१ - तीन

  • मुखेड - ६९ - दोन

  • देगलूर - ६१ - चार

  • कंधार - ६१ - एक

  • हदगाव - ५५ - एक

  • बिलोली - ५१ - एक

  • माहूर - २५ - एक

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com