Success Story : झुकिनी या विदेशी फळभाजीची नांदेडातही यशस्वी शेती

प्रल्हाद कांबळे
Friday, 29 January 2021

झुकिनी फळभाजीची बीज प्रक्रियेसाठीसुद्धा ते लागवड करीत आहेत. अमेरिका देशातील नागरिक मोठ्या प्रमाणात झुकिनीचा भाजीसाठी उपयोग करतात.

नांदेड : नांदेड जिल्ह्यातील लोहा तालुक्यात एका शेतकऱ्यांने झुकिनी या विदेशी फळभाजीची यशस्वी शेती केली आहे. पोखरभोसी इथल्या संजय ताठे या शेतकऱ्याने हा फळ पिकाचा यशस्वी प्रयोग केला असून मागील दोन वर्षापासून झुकीनी या फळभाजी पिकाची लागवड करुन चांगले उत्पन्न मिळवत आहेत.

झुकिनी फळभाजीची बीज प्रक्रियेसाठीसुद्धा ते लागवड करीत आहेत. अमेरिका देशातील नागरिक मोठ्या प्रमाणात झुकिनीचा भाजीसाठी उपयोग करतात. मात्र असे असले तरी इटलीत या फळभाजीचे सर्वाधिक उत्पादन होते. झुकिणी हा आपल्या ‘फायद्याचा’ विदेशी भाजीपाला आहे. हे लक्षात आल्यावर नांदेडच्या संजय ताठे यांनी आपल्या शेतात या पिकाची लागवड केली.

हेही वाचाऔंढ्यात माणुसकीचे घडले दर्शन; विसरलेली एक लाख दहा हजाराची सोनसाखळी केली परत

आपल्या वातावरणात देखील उत्तम प्रकारे हे पीक येते. या भाजीमध्ये मोठ्या प्रमाणात प्रोटीन, कॅलरीज आणि खनिज प्रथिने मिळतात”, अशी माहिती संजय ताठे या शेतकऱ्याने दिली. मात्र आपल्या देशात याचा खाण्यासाठी लोक वापर करत नसल्याने ते बीज उत्पादन करुन यातून वर्षाला दीड ते दोन लाख रुपयांचा निव्वळ नफा मिळवत आहेत.

झुकिनी या फळ भाजीला क्युकरबिटा पेपो (Cucurbita Pepo)तसेच कोर्टगेट (Courgette) नावाने जगभरात ओळखल्या जाते. औषधी गुणधर्मामुळे ही फळभाजी अनेक आजारावर रामबाण औषध म्हणून ओळखली जाते.

झुकिनीमध्ये दोन प्रकार आहेत. एक हिरव्या रंगाची तर एक पिवळ्या रंगाची. झुकिनीच्या पिकांवर किडीचा प्रादुर्भाव लगेच होतो म्हणून वारंवार किटकनाशके फवारावी लागतात. कमी कालावधी आणि बाजाराची स्थिती पाहून झुकिनी पिकाची लागवड करुन संजय ताठे यांनी कोरोनाच्या काळातही चांगलं उत्पन्न मिळवले आहे.

येथे क्लिक कराकिती वाचला? किती पुजला? यापेक्षा बुद्धाचा धम्म आचरणात किती आणला? यालाच मोठे महत्त्व- भदंत इन्दवन्श महाथेरो

झुकिनीची वैशिष्ट काय…?

झुकिनी हे काकडीवर्गीय पीक आहे.
झुकिनी हे मूळत: अमेरिकेतील पिक आहे मात्र इटलीत या पिकाचं सर्वाधिक उत्पादन होते.
विविध विदेशी व्यंजनांमध्ये तसेच दक्षिण भारतातील व्यंजनामध्ये झुकिनीचा वापर केला जातो.
पंचतारांकित हॉटेल्समध्ये झुकिनाला मोठी मागणी आहे.
लागवडीनंतर अवघ्या महिन्याभरात हे पीक कापणीला तयार असते.
झुकिनी पिकाला बाजारात दर चांगला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Success Story: Successful cultivation of Zucchini, an exotic fruit and vegetable in Nanded