निराधार, निराश्रीतांना असाही आधार 

कृष्णा जोमेगावकर
मंगळवार, 19 मे 2020

प्रवाशी नागरिकांची अन्नपाण्यावाचून त्यांची होत असलेली परवड लक्षात घेता विश्व भोजन सुरू करण्यात आले. सेवानिवृत्त मुख्याध्यापक विरेंद्र शिवराम आऊलवार यांनी पुढाकार घेऊन हा उपक्रम सुरू केला.

नांदेड : कोरोना विषाणूच्या जागतिक महामारीत लोहा तालुक्यातील सोनखेड येथे ग्रूप ऑफ कृष्णा ऍग्रो सर्व्हिसेसच्या माध्यमातून ता. ५ एप्रिल पासून ताजा व हिरवा भाजीपाला दिव्यांग, शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंब, ज्येष्ठ नागरिक या सोबतच पोलीस कर्मचारी, गृहरक्षक दल आदींना मोफत वाटप करण्यात येत आहे.

दहा हजार नागरिकांना दिलासाठ
शेतकऱ्याच्या बांधावरून थेट खरेदी करून त्यांना त्यांच्या आधार संलग्न बँक खात्यावर आनलाईन पैसे देण्यात येत आहेत. हा खरेदी केलेला हिरवा भाजीपाला आतापर्यंत दहा हजार दिव्यांग, शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंब, ज्येष्ठ नागरिक या सोबतच पोलीस कर्मचारी, गृहरक्षक दल आदींना मोफत वाटप करण्यात येत आहे. 

हेही वाचलेच पाहिजे.....शेतकऱ्यांनी काळजी करु नये......कशासाठी ते वाचा

विश्व भोजनची संकल्पना 
लॉकडाउन जाहीर झाल्यापासून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलेल्या आवाहनानुसार विश्व भोजनची संकल्पना राबविण्यात येत आहे. दररोज सहाशे ते सातशे  लोकांना डब्बा बंद जेवणही पुरविण्यात येत आहे. ठाणे, पुणे, औरंगाबाद, नाशिक, कोल्हापूर या भागातून दररोज अनेक नागरिक पायी येत आहेत. काही जण सायकलद्वारे नांदेडहुन पुढे जात आहेत. 

हेही वाचा...........म्हणून लहान शेतकरी आले अडचणीत

प्रवाशी नागरिकांची केली सोय
प्रवाशी नागरिकांची अन्नपाण्यावाचून त्यांची होत असलेली परवड लक्षात घेता विश्व भोजन सुरू करण्यात आले. सेवानिवृत्त मुख्याध्यापक विरेंद्र शिवराम आऊलवार यांनी पुढाकार घेऊन हा उपक्रम सुरू केला. यामध्ये त्यांच्या पत्नी तारामती आऊलवर आणि सुन सोनी सतेंद्र आऊलवार यांनी पुढकार घेतला. नांदेडचे जिल्हा समाज कल्याण अधिकारी सतेंद्र आऊलवार यांनी ही यात मोलाचे योगदान आणि मार्गदर्शन दिले आहे.

कोरोना योध्यांची निरपेक्ष सेवा
कोरोनाशी दोन हात करतांना माणसाची अंगभूत प्रतिकारशक्ती हेच एक शस्त्र आहे. भारत सरकारच्या आयुष मंत्रालयाने सुचवलेले कोरोना विषाणू विरोधात प्रतिकारशक्ती वाढवण्याकरता आर्सेनिक अल्बम ३० या होमिओपॅथिकच्या गोळ्या सेवन करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. तीन दिवस हा डोस घेतल्यास, रोगप्रतिकारक शक्तीवाढण्यास मदत होते. 

विनामुल्य गोळ्यांचे वाटप
आरोग्यसंपदा होमिओपॅथिक क्लिनिकचे संचालक डॉ. संतोषकुमार स्वामी यांनी विनामूल्य वझीराबाद पोलीस ठाणाच्या सर्व पोलीस बांधवांसाठी मोफत उपलब्धत करून, वरिष्ठ पोलीस निरिक्षक संदीप शिवले यांच्याकडे सुपूर्द केले. यावेळी सहाय्यक पोलीस निरिक्षक सुनील बडे, बिरबल यादव, किशन फटाले आदी उपस्थित होते. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Such a basis for the homeless, the homeless