मियावाकी वृक्षलागवडीसाठी पुढाकार घ्यावा.....कोण म्हणाले ते वाचा

file photo
file photo

नांदेड : राष्ट्रीय वनधोरणानुसार एकुण भौगोलिक क्षेत्राच्या ३३ टक्के वनाच्छादन असणे आवश्यक आहे. यादृष्टिने महाराष्ट्र शासनातर्फे पूर्वी पासून प्रयत्न केले जात आहेत. आजही शासकीय कार्यालयाच्या परिसरात मोठ्या प्रमाणात रिकाम्या जागा उपलब्ध आहेत. या जागेवर प्राथमिकस्तरावर मियावाकी पद्धतीने घनवन लागवड करण्यासाठी शासनाच्या जिल्ह्यातील सर्व अधिकाऱ्यांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन यांनी केले.

अटल आनंदवन घनवन (मियावाकी) कार्यशाळा
नांदेड वनविभागमार्फत वसंतराव नाईक हरित महाराष्ट्र अभियान अंतर्गत अटल आनंदवन घनवन (मियावाकी) कार्यशाळा बुधवारी (ता. २५) डॉ. शंकरराव चव्हाण जिल्हा नियोजन भवनच्या सभागृहात आयोजित करण्यात आली होती. या कार्यशाळेस पोलीस अधीक्षक विजयकुमार मगर, सहाय्यक जिल्हाधिकारी तथा एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाचे प्रकल्प अधिकारी डॉ. अभिनव गोयल, औरंगाबाद विभागाचे मुख्य वनसंरक्षक प्रकाश महाजन, उपवन संरक्षक अशिष ठाकरे, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. शरद कुलकर्णी, मनपा आयुक्त डॉ. सुनील लहाने उपस्थित होते.

पर्यावरणालाही मिळणार हातभार
शासन व ग्रामपंचायतीच्या हद्दीमध्ये स्मशानभुमी, शाळा, पेयजल योजनेच्या टाक्या आदी परिसरात मियावाकी पद्धतीने वृक्षलागवड केल्यास या परिसराच्या सुशोभीकरणासह पर्यावरणालाही हातभार आपल्याला लावता येईल. याच्या प्रचार व प्रसारासाठी जिल्ह्यातील सर्व विभाग प्रमुखांनी तालुका पातळीवर बैठका घेऊन त्या-त्या ठिकाणच्या सेवाभावी संस्थांचा यात सहभाग करुन घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन यांनी केले.

झाडांकडून मिळतात चांगल्या गोष्टी
झाडे मानसांकडून काहीही मागत नाही. उलट प्रत्येकाला ते अनेक चांगल्या गोष्टी देत राहते. यात फुले, सुगंध, फळे, पाला, लाकूड सारेकाही झाड माणसाला देते, असे प्रकाश महाजन यांनी सांगून अटल आनंदवन घनवन वृक्षलागवडीचे तंत्रज्ञान समजून सांगितले. मियावाकी लागवडीबाबत जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी त्यांच्या लातूर येथील जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून राबविलेल्या मियावाकी वृक्षलागवडीचे सचित्र सादरीकरण करुन माहिती दिली.

लोकराज्य मासिकाचे मोफत वाटप
सामाजिक न्याय दिवस व जागतिक आमली पदार्थ विरोधी दिनानिमित्त जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व कै. सोपानराव तादलापूरकर क्रीडा मंडळ व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवारी (ता. २६) लोकराज्य मासिकाचे वाटप राजर्षी शाहु महाराज पुतळा येथे सकाळी दहा वाजता होणार आहे. 

लाभ घेण्याचे नागरिकांना आवाहन
मासिकाचे वाटप राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा सरचिटणीस गणेश तादलापूरकर व व्यसनमुक्ती संकल्प मासिकचे संपादक निलेश तादलापूरकर यांच्या हस्ते कण्यात येणार आहे. नागरिकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन संस्थेचे सचिव माहेश्वरी सोपानराव तादलापूरकर, अध्यक्ष कैलास गायकवाड, सांस्कृतिक कार्य प्रमुख शिवशंकर मुळे तसेच अण्णाभाऊ साठे कम्युनिष्ट पार्टीचे संस्थापक अध्यक्ष  प्रा. सदाशिव भुयारे यांनी केले आहे. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com