पोलिस दाम्पत्याची सामाजिक बांधिलकी; निराधार कुटुंबातील कन्येच्या लग्नास मदत

देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, पण घेता घेता देणाऱ्याचे हात घ्यावे या उक्तीची खरी अनुभूती अर्धापूर तालुक्यात आली.
अर्धापूर लग्न सोहळा
अर्धापूर लग्न सोहळा

अर्धापूर ( जिल्हा नांदेड ) : देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, पण घेता घेता देणाऱ्याचे हात घ्यावे या उक्तीची खरी अनुभूती अर्धापूर तालुक्यात आली. तालुक्यातील निमगाव येथे राहात असलेल्या अल्पभूधारक निराधार शेतकरी महिलेच्या मुलीच्या विवाहासाठी आर्थिक मदत देत नवविवाहित पोलिस दाम्पत्याकडून आपल्या विवाहाच्या खर्चास फाटा देत निराधार कुटुंबातील मुलींच्या विवाहासाठी आर्थिक मदत दिल्याने त्यांचे डोळे भरुन आले. हा प्रसंग सर्वांच्या डोळ्यात पाणी आणणारा ठरला यानिमित्त वर्दीतील माणुसकीचे पुन्हा एकदा दर्शन झाले आहे.

अर्धापूर तालुक्यातील सावरगाव येथील प्रहार जनशक्ती पक्षाचे तालुकाप्रमुख छगन पाटील सांगोळे यांची बहिण सीमा ही मुंबई, दादर येथे पोलिस विभागात कार्यरत आहे. तिचा विवाह कुंभारवाडी (ता. गेवराई, जिल्हा बीड ) येथील धारावी, मुंबई येथे पोलिस उपनिरीक्षक पदावर कार्यरत असलेल्या अंकुश जाधव यांच्याशी गुरुवारी (ता. २२) झाला. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर खबरदारी घेत कमी लोकांच्या उपस्थित हा विवाह पार पडला. विवाहात अवाजवी खर्चाला फाटा देत अल्पभूधारक निराधार शेतकरी कुटुंबात अंकिताच्या लग्नास दिली आर्थिक मदत दिली.

हेही वाचा - ग्रामपंचायत निवडणूक वाद पेटला : नायगावच्या मेळगाव येथे दोन गटात हाणामारी; 21 जणांवर गुन्हे दाखल

अर्धापूर तालुक्यातील निमगाव येथील सुनिता व्यंकटी खटके यांच्या पतीचे आजारपणामुळे गेल्या आठ वर्षापूर्वी निधन झाले. पतीच्या निधनानंतर दोन मुली व एक मुलगा अश्या कुटूंबाचा भार श्रीमती सुनीता यांच्यावर आला. त्या मजुरी करुन कुटुंबाचा घरखर्च चालवत व मुलगी अंकिताच्या लग्नासाठी बचत केलेल्या पैशांमध्ये लग्नासाठी लागणारे साहित्य साड्या, भांडे, सोनं इतर साहित्य खरेदी करुन ठेवले होते. हे विवाहाचे साहित्य ता. २६ नोव्हेंबरच्या रात्री अचानक घराला आग लागल्याने त्यात सर्व जळून खाक झाले होते.

वडिलांचे छत्र हरवलेल्या व आर्थिक परिस्थितीने खचलेल्या एका निराधार शेतकरी कन्येच्या विवाहास आर्थिक मदत देत सामाजिक बांधिलकी जोपासत खऱ्या अर्थाने गरजवंतास मदत देत माणुसकीचे दर्शन झाले. याप्रसंगी मुलीच्या आईच्या डोळ्यात अश्रू येत होते. या ऱ्ह्दयस्पर्शी प्रसंगाची सर्वत्र चर्चा होत असून ता. ३० एप्रिल रोजी अंकिताचा विवाह आहे. यासाठी आणखी दानशूर व्यक्तीने समोर येण्याची गरज आहे.

अंकिताच्या विवाह कार्यास मदत करुन त्यांच्या कुटुंबातील गरीबी परिस्थिती दूर करण्याचा व दुःख वाटून घेण्याचा छोटासा प्रयत्न केला आहे.

- छगन पा. सांगोळे, प्रहार तालुकाप्रमुख अर्धापूर.

संपादन- प्रल्हाद कांबळे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com