esakal | अर्धापुरात चक्क कांद्याच्या रोपांची चोरी, शेतक-यांचे आर्थिक नुकसान
sakal

बोलून बातमी शोधा

file photo

शहरातील एक शेतक-याने अर्धा एकर शेतात काद्यांचे रोप लावले होते.या लावलेल्या रोपांचीच चोरी  आज्ञात चोरी केल्याची घटना झाली आहे.

अर्धापुरात चक्क कांद्याच्या रोपांची चोरी, शेतक-यांचे आर्थिक नुकसान

sakal_logo
By
लक्ष्मीकांत मुळे

अर्धापूर (जिल्हा नांदेड) : केंव्हा कशाची चोरी होईल हे सांगता येत नाही. भामटे विविध शक्कल लढवून चो-या करित आसतात. सध्या कांद्याचे भाव वाढत आसल्यामुळे शेतकरी मोठ्या प्रमाणात कांद्याची लागवड करित आहेत. शहरातील एक शेतक-याने अर्धा एकर शेतात काद्यांचे रोप लावले होते. या लावलेल्या रोपांचीच चोरी अज्ञात चोरी केल्याची घटना झाली आहे. या शेतक-याला खूप मोठा अर्थिक फटका बसला आहे.

शेतीवर विविध संकटांची मालिका सुरूच आहे. कधी ओला दुष्काळ तर कधी कोरडा. नापीकी, शेत मालाचे भाव पडणे, वन्य प्रण्यांकडून पिकांची नासडी, मिळणार भाव कमी, खंडीत विज पुरवठा आदी संकट कमी काय आत्त चोरं चक्क कांद्याच्या रोपांची चोरी करित आहेत.

हेही वाचानांदेड : माता साहेब देवाजी यांच्या जन्मोत्सवात धार्मिक पाठ, कथा व कीर्तन! -

शेतकरी प्रल्हाद माटे शेतात विविध भाजीपाला पिके घेतात

बाजारात भाजीपाल्याच्या किंमती वाढल्याने शेतकरी या पिकाकडे वळला आहे. भाजीपाला पिकातून चार पैसे उरत आहे बाजारात कांद्याल चांगल्या भाव मिळत आसल्यामुळे कांदा लागवडीकडे शेतकरी वळला आहे. कांद्याचे लागवडी क्षेत्र वाढत आहे. शहरातील शेतकरी प्रल्हाद माटे शेतात विविध भाजीपाला पिके घेतात. यंदा कांद्याला चांगला भाव मिळत आसल्यामुळे त्यांनी कांदा लागवडीचा निर्णय घेतला. त्यासाठी शेतीची चांगली मशागत करून काही दीवसापुर्वी अर्ध्या एकरमध्ये कांद्याच्या रोपांची लावणी केली. अज्ञात चोरट्यांनी पाळत ठेवून रातोरात कांद्याची रोपे चोरून नेली.

मी विस दिवसांपूर्वी अर्ध्या एकरमध्ये कांद्याची रोपे

ही रोपे चांगली वाढीला लागली होती. अज्ञात चोरट्यांनी शुक्रवारी (ता  23) रात्री लावलेल्या कांद्याच्या शेतातील मध्यभागतील रोपे पात कापून रोपे चोरून नेली. ही बाब सकाळी निदर्शनास आली. निसर्ग पिके येवू देईना, पिक आले तर भाव मिळेना आत्ता तर लावलेल्या रोपांची चोरी होत आहे. वन्य प्राण्यांचा त्रास ही तर नित्याचीच बाब झाली आहे. अशी प्रतिक्रिया शेतकरी प्रल्हाद माटे यांनी दिला.

संपादन - प्रल्हाद कांबळे

loading image