esakal | चोरट्यांना न्यायालयीन कोठडी- खंजर, मोबाईल्स आणि दुचाकी जप्त   
sakal

बोलून बातमी शोधा

file photo

या तिन्ही आरोपींना पोलिस कोठडी संपल्याने सोमवारी (ता. २२) न्यायालयीन कोठडी मिळाली.

चोरट्यांना न्यायालयीन कोठडी- खंजर, मोबाईल्स आणि दुचाकी जप्त   

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नांदेड : एखादा गंभीर गुन्हा करण्याच्या तयारीत असलेल्या चोरट्यांना विमानतळ पोलिसांनी अटक केली. या तिन्ही आरोपींना पोलिस कोठडी संपल्याने सोमवारी (ता. २२) न्यायालयीन कोठडी मिळाली. पोलिस कोठडीत असतांना चोरट्यांकडून पोलिसांनी चोरीचे पाच मोबाईल व एक दुचाकी जप्त केले. 

शहरातील फरार व पाहिजे असलेल्या गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्याचे आदेश पोलिस अधीक्षक विजयकुमार मगर यांनी सर्वच ठाणेदारांना दिले आहेत. आपल्या हद्दीत कायदा व सुव्यवस्था बाधीत झाल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी संबंधीत ठाणेदारांची असणार आहे. अशा कडक शब्दात सुचना दिल्याने सर्वच ठाणेदार आपल्या हद्दीत कर्मचाऱ्यांमार्फत गस्त घालत आहेत. 

हेही वाचा -  Video - गोदावरी नदीचे प्रदूषण थांबविणे आहे शक्य, कसे? ते वाचाच

मालटेकडी परिसरातील पुलाखाली कारवाई

विमानतळ पोलिस ठाण्याच्या हद्दीत पोलिस उपाधिक्षक (शहर) अभिजीत फस्के यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक संजय ननवरे यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना गस्त घालण्यास सांगितले. मालटेकडी गुरुद्वारा परसिराचे बीट हवालदार विलास लोखंडे हे आपले सहकारी हरप्रितसिंग सुखोई यांना सोबत घेऊन ता. १८ जून रोजी सायंकाळच्या सुमारास गस्त घालत होते. हे मालटेकडी गुरुद्वारा परिसरात असतांना त्यांना मिळालेल्या माहितीनुसार त्यांनी या परिसरात असलेल्या पुलाखाली धाव घेतली. एखादा गंभीर गुन्हा करण्याच्या तयारीत असलेल्या तिघांना खंजरसह ताब्यात घेतले. 

हे आहेत अट्टल गुन्हेगार

त्यांचे नाव विचारले असता त्यांनी मंजीतसिंग किशनसिंग शिरपल्लीवाले (वय २२) रा. सखोजीनगर, छाटूसिंग उर्फ प्रतापसिंग बाबुसिंग शिरपल्लीवाले (वय २७) रा. दत्तनगर आणि वैभव गौत्तम सावळे (वय १९) रा. वडेपूरी (ता. लोहा) आपले नावं सांगितले. या तिघांना घेऊन पोलिस विमानतळ ठाण्यात हजर झाले. विलास लोखंडे यांच्या फिर्यादीवरुन या तिघांवर भारतीय हत्यार कायदा व चोरीचा गुन्हा दाखल केला. 

येथे क्लिक करा - एलसीबीची कारवाई, उस्माननगर पोलिसांच्या जिव्हारी

तिघांना न्यायालयीन कोठडी

या तिघांना न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्यांना सोमवार (ता. २२) पर्यंत पोलिस कोठडीत पाठविले होते. पोलिसांनी पोलिस कोठडीतील आरोपींताकडून पाच किंमती मोबाईल आणि चोरीची दुचाकी (पल्सर) जप्त केली. सोमवारी पोलिस निरीक्षक संजय ननवरे आणि हवालदार विलास लोखंडे यांनी पोलिस कोठडी संपल्याने परत न्यायालयासमोर हजर केले. यावेळी न्यायालयाने या तिघांना न्यायालयीन कोठडीत पाठविले आहे.