esakal | Nanded : नांदेडमधील दुकानातून ३१ तलवारी, १६ खंजीर जप्त
sakal

बोलून बातमी शोधा

गुन्हे

Nanded : नांदेडमधील दुकानातून ३१ तलवारी, १६ खंजीर जप्त

sakal_logo
By
अभय कुळकजाईकर

नांदेड : वजिराबाद पोलिसांनी शहरातील (Crime In Nanded) सुखमणी गिफ्ट सेंटरवर छापा टाकून २८ हजार सातशे रुपयांच्या ३१ तलवारी आणि पाच हजार चारशे रुपयांचे १६ खंजीर असा एकूण ३४ हजार शंभर रुपयांचा ऐवज जप्त केला आहे. याबाबत दुकान मालक जसवंतसिंग प्रतापसिंग सुखमणी (वय ४८, रा. अबचलनगर, नांदेड) (Nanded) याला अटक करून त्याच्याविरुद्ध मंगळवारी (ता. तीन) गुन्हा दाखल केला आहे. जिल्ह्यातील गुन्हेगारीवर आळा घालण्यासाठी पोलिस अधीक्षक प्रमोदकुमार शेवाळे (IPS Pramodkumar Shewale) यांनी प्रतिबंधकात्मक कडक कारवाईच्या सूचना ठाणे प्रमुखांना दिल्या आहेत. त्यानुसार कारवाई सुरू झाली आहे.

हेही वाचा: साताऱ्यात सहा वाहनांचा विचित्र अपघात; दोघे ठार, तिघे जखमी

वजिराबादचे पोलिस निरीक्षक जगदीश भंडरवार यांच्या सूचनेनुसार गुन्हे शोध पथकाचे फौजदार प्रवीण आगलावे, पोलिस नायक गजाजन किडे, मनोज परदेशी, पोलिस शिपाई संतोष बेलुरोड, इम्रान शेख, शरदचंद्र चावरे, व्यंकट गंगुलवार, चंद्रकांत बिरादार यांचे पथक गस्त घालत होते. त्यांना मिळालेल्या माहितीवरून सुखमणी गिफ्ट सेंटरवर छापा टाकण्यात आला. त्यावेळी दुकानात ३१ तलवारी आणि १६ खंजीर आढळले. पंचासमक्ष ही कारवाई करण्यात आली. याबाबत पोलिस शिपाई बालाजी कदम यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल झाला.

loading image
go to top