मोक्कातील दोघांसह तिघांना अटक; नांदेडच्या स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

जिल्हा व शहरातील फरार व पाहिजे आरोपींच्या मुसक्या आवळण्याच्या सुचना पोलिस अधीक्षक प्रमोद शेवाळे यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक द्वारकादास चिखलीकर यांना दिल्या.
नांदेड स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
नांदेड स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

नांदेड : मोक्का कायद्यातील फरार दोघांना आणि एका घरफोडी करणाऱ्यांसह तीन अट्टल गुन्हेगारांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली. त्यांच्याकडून सोन्याचे दागिणे व एक दुचाकी असादोन लाख १४ हजार २९८ रुपयांचा ऐवज जप्त केला आहे.

जिल्हा व शहरातील फरार व पाहिजे आरोपींच्या मुसक्या आवळण्याच्या सुचना पोलिस अधीक्षक प्रमोद शेवाळे यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक द्वारकादास चिखलीकर यांना दिल्या. यावरुन त्यांच्या सहकाऱ्यांनी शहर व जिल्ह्यात गस्त घालण्यास सुरुवात केली. पथकाने मोहन ( छोटा ) बाबूराव उर्फ राजेंद्र भोसले ( वय २९ ) रा. कुरुळा ता. कंधार, मोहन ( मोठा ) बाबूराव उर्फ राजेंद्र भोसले ( वय ४२ ) रा. कुरुळा ता. कंधार आणि संजय शहाजी भोसले ( वय ३८ ) रा. देळूब ता. अर्धापूर या तिघांना ताब्यात घेतले. त्यांनी उस्माननगर, माळाकोळी, मुखेड आणि अर्धापूर पोलिस ठाण्याच्या हद्दीत दुचाकी चोरल्याची कबुली दिली. या अट्टल घरफोडी करणाऱ्यांकडून स्थानिक गुन्हा शाखेच्या पथकाने सोन्या- चांदीचे दागिणे आणि एक दुचाकी असा दोन लाख १४ हजार २९८ रुपयांचा ऐवज जप्त केला आहे. त्यांनी केलेल्या घरफोडीच्या गुन्ह्यासंदर्भाने त्यांची रवागनी अर्धापूर आणि मुखेड पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे.

हेही वाचा - राज्य सरकार, पालिकेच्या भूमिकेमुळे मुंबईतील व्यवसाय डबघाईला आल्याचा व्यापारी संघटनेचा आरोप

पकडलेल्या आरोपींपैकी मोहन ( मोठा ) याच्याविरुध्द तुळजापूर आणि नांदेड जिल्ह्यातील कुंडलवाडी अशा दोन पोलिस ठाण्यामध्ये मोक्का कायद्यान्वये गुन्हे दाखल झाले आहेत. तसेच मोहन ( छोटा ) आणि संजय या दोघांविरुध्द नांदेड जिल्ह्यात चार गुन्ह्यांमध्ये फरारी आरोपी अशी नोंद आहे. या चोरचोरट्यांकडून अजून काही गुन्हे केल्याची कबुली होईल असा विश्वास पोलिस निरिक्षक द्वारकादास चिखलीकर यांनी व्यक्त केला.

पोलिस अधिक्ष प्रमोद शेवाळे, अतिरिक्त पोलिस अधिक्षक निलेश मोरे, पोलिस निरिक्षक द्वारकादास चिखलीकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हा शाखेचे सहाय्यक पोलिस निरीक्षक पांडूरंग भारती, उपनिरिक्षक संजय सोनवणे, पोलिस अंमलदार गुंडेराव करले, संग्राम केंद्रे, संजय जिंकलवाड, बालाजी तेलंग, रुपेश दासरवाड, पिराजी गायकवाड, देविदास चव्हाण, अफजल पठाण, रवि बाबर, बालाजी यादगीरवाड, विठ्ठल शेळके, हनुमानसिंह ठाकूर यांनी या मोहीमेत सहभाग घेतला होता. या पथकाचे वरिष्ठांनी कौतुक केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com