esakal | बिदर कारागृहातील फरार तिघांना अटक, स्थागुशा नांदेड
sakal

बोलून बातमी शोधा

file photo

हे दोन्ही आरोपी २३ माली गुन्ह्यातील गुन्हेगार असून आणखी त्यांनी पाच गुन्ह्यांची कबुली दिली आहे. 

बिदर कारागृहातील फरार तिघांना अटक, स्थागुशा नांदेड

sakal_logo
By
प्रल्हाद कांबळे

नांदेड : कर्नाटक राज्यातील बिदर कारागृहातुन पसार झालेले कुख्यात तिन गुन्हेगार स्थानिक गुन्हे शाखेच्या जाळ्यात सोमवारी (ता. १५) देगलूर परिसरात अडकले. हे दोन्ही आरोपी २३ माली गुन्ह्यातील गुन्हेगार असून आणखी त्यांनी पाच गुन्ह्यांची कबुली दिली आहे. 

जिल्ह्यातील घडलेल्या चोरी, घरफोडी या माली गुन्ह्याची उकल करण्यासाठी पोलिस अधीक्षक विजयकुमार मगर यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक द्वारकादास चिखलीकर यांना सुचना दिल्या. यावरुन श्री. चिखलीकर यांनी आपल्या पथकाला कार्यरत केले. पथक प्रमुख तथा सहाय्यक पोलिस निरीक्षक रमाकांत पांचाळ यांनी आपल्या सहकाऱ्यासह देगलूर तालुक्यात गस्त सुरू केली. त्यांना मिळालेल्या माहितीवरुन कर्नाटक राज्यतील बिदर येथील कारागृहातून पसार झालेले दोन आरोपी देगलुर परिसरात लपून बसल्याची माहिती मिळाली. 

हेही वाचालोहा शहरात ‘इतक्या’ लाखाची धाडशी घरफोडी... वाचा

या तिघांवरही विविध गंभीर गुन्हे दाखल

यावरुन या पथकाने शिताफीने सापळा लावून देगलुर हद्दीत खानापूर शिवारारत एखादा गंभीर गुन्हा करण्याच्या तयारीत असलेल्या कुख्यात गुन्हेगार नामदेव रामकिशन भोसले रा. मंग्याळ तांडा (ता. मुखेड), भास्कर दादाराव चव्हाण रा. जांभळी तांडा (ता. मुखेड) व चाफरान पानबाबू भोसले रा. निवघा बाजार (ता. हदगाव) यांना पोलिसांनी जीव धोक्यात टाकून पकडले. यातील नामदेव भोसले याच्यावर २३ माली गुन्हे दाखल आहेत. तसेच तो बिदर कारागृहातून पसार झालेला आहे. त्याने पुन्हा पोलिसांना पाच गुन्ह्यांची कबुली दिली असल्याचे पोलिसांनी सांगितले. या तिन्ही आरोपींनी देगलुर, नायगाव व लोहा तालुक्यात घरफोडी केल्याची कबुली दिली आहे. या तिन्ही आरोपींना देगलुर पोलिसांच्या स्वाधीन केले असून तपास पोलिस निरीक्षक भगवान धबडगे करत आहेत. 

येथे क्लिक करा नांदेडकरांना सोमवारी साखर झोपेतच धक्का, सहा पॉझिटिव्ह

यांनी घेतले परिश्रम

सदरची कारवाई पोलिस निरीक्षक द्वारकादास चिखलीकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरिक्षक रमाकांत पांचाळ, हवालदार श्री. करले, सलीम बेग, बालाजी तेलंग, अफजल पठाण, देवा चव्हाण, रवी बाबर, बालाजी यादगीलवार, पद्मा कांबळे, शंकर केंद्रे आणि हेमंत बिचकेवार यांनी पार पाडली. पथकाचे पोलिस अधीक्षक व अतिरिक्त पोलिस अधीक्षक दत्तराम राठोड यांनी कोतुक केले आहे.