
नांदेड : ट्रक चालकाने दुचाकीस्वाराला जोराची धडक दिली. यात दुचाकीस्वार जागीच ठार तर एकजण जखमी झाला. त्यानंतर ट्रक रस्त्याच्या कडेला चरत असलेल्या मेंढ्याच्या कळपात घुसला. या अपघातात आठ मेंढ्यांचाही चिरडून मृत्यू झाला. ही घटना मांडवी ते सारखणी रस्त्यावर शनिवारी (ता. २३) सायंकाळी सातच्या सुमारास घडली.
किनवट तालुक्यातील गौरी येथील जगन रोहिदास पवार (वय २४) आणि भिमराव घुट्टी चव्हाण हे आपली दुचाकी (एमएच२६-पी-९३९५) वरून मांडवी ते सारखणी शनिवारी सायंकाळी जात होते. मांडवी पुलाजवळ त्यांची दुचाकी येताच समोरून येणाऱ्या भराव वेगतील ट्रक चालकाने आपल्या ताब्यातील ट्रक हयगयी व निष्काळजीपणे चालवून जगन पवार याच्या दुचाकीला जबर धडक दिली. धडक इतकी जोरात होती की दुचाकीस्वार पंधरा फुट उंच उडून रस्त्याच्या कडेला असलेल्या दगडावर पडला. त्याच्या डोक्यास जबर मार लागल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. तर त्याचा सहकारी भमराव चव्हाण हा गंभीर जखमी झाला.
मांडवी पोलिस ठाण्यात ट्रक चालकाविरुद्ध विविध कलमन्वये गुन्हा दाखल
दुचाकीला धडक देऊन पसार होण्याच्या नादात ट्रक चालकाचा ट्रकवरील ताबा सुटला आणि रस्त्याच्या कडेला रत असलेल्या मेंढ्यांच्या कळपात घुसला. यावेळी यात आठ मेंढ्यांचा चिरडून मृत्यू झाला. यात मेंढपाळ लखन मडावी याची एक लाखाची नुकसान झाली. या प्रकरणी लखन उकंडराव मडावी याच्या फिर्यादीवरुन मांडवी पोलिस ठाण्यात ट्रक चालकाविरुद्ध विविध कलमन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक संतोष केंद्रे करत आहेत.
दारुच्या नशेत घडला प्रकार
ट्रक चालक हा मद्यधुंद अवस्थेत आपला ट्रक भरधाव वेगात चालवत किनवटकडे येत होता. ट्रकच्या वेगाचा अंदाज त्याला येत नसल्याने वायुवेगाने तो निघाला. मात्र रस्त्यात दुचाकीला व मेंढ्यांना धडक देऊन ठार केले. सुदैवाने या दुचाकीवरील भिमराव चव्हाण हा रस्त्याच्या बाजूला पडल्याने तो वाचला. मात्र जगन पवार हा ठार झाला.
येथे क्लिक करा - कंटेनरखाली बाळाला फेकणाऱ्या निर्दयी मातेला पोलिस कोठडी
मेंढपाळाची लाखाची नुकसान
अगोदरच लॉकडाउनमध्ये हातावर पोट असणाऱ्यांना जीवन जगण्यासाठी कसरत करावी लागत आहे. अनेकांच्या हातचा रोजगार गेल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ येत आहे. त्यातच मांडवी (ता. किनवट) परिसरात एका मेंढपाळावर संकट कोसळले. ट्रक खाली आलेल्या आठ मेंढ्याचा चिरडून मृत्यू झाला. यात त्याची एका लाखाची नुकसान झाल्याचे त्याने आपल्या तक्रारीत नमुद केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.