esakal | Video : ‘आयसीएमआर’चे पथक नांदेडात, काय आहे कारण? तुम्ही वाचाच 
sakal

बोलून बातमी शोधा

Nanded News

आयसीएमआर विभागांतर्गत पुण्याच्या मुख्य कार्यालयातील पथक नांदेड दौऱ्यावर आले आहे. दिवसभरातील ४०० लोकांचे रक्तजल नमुने तपासणी करिता घेतले जाणार असून, त्याची चन्नई येथील प्रयोग शाळेत चाचणी केली जाणार आहे.  

Video : ‘आयसीएमआर’चे पथक नांदेडात, काय आहे कारण? तुम्ही वाचाच 

sakal_logo
By
शिवचरण वावळे

नांदेड : आयसीएमआरचे महाराष्ट्रातील मुख्यालय असलेल्या पुणे येथुन १० जणांचे पथक जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले आहे. हे पथक इतवारा कंटेंटमेंट झोन भागातील चिरागगल्ली, लोहार गल्ली, कुंभार टेकडी, सराफा परीसर अशा भागातील नागरीकांच्या रक्ताचे नमुने तपासणीसाठी घेणार असून, रक्तातील घटकांचा अभ्यास करणार असल्याचे पथकातील अकांक्षा चौधरी यांनी सांगितले. 

अनेक दिवसांपासून केंद्रातून आरोग्य पथक येणार असल्याची चर्चा सुरु होती. परंतु पथक नेमके कधी येणार? याबद्दल निश्चित ठरले नव्हते. त्यामुळे शनिवारी (ता.२३ मे) येणारे आरोग्य पथकाचे विमानात तांत्रिक अडचण आल्याने पथक दोन दिवस उशिराने येणार असल्याचे आरोग्य विभागच्या अधिकाऱ्यांनी सांगितले होते. मात्र, त्याच दिवशी पथक परभणी जिल्ह्यात दाखल झाले आणि रविवारी (ता.२४ मे) सकाळी हे पथक नांदेडात दाखल झाले. 

हेही वाचा- खळबळजनक : साधूसह शिष्याच्या हत्येने नांदेड हादरलं

दिवसभरात ४०० सॅम्पल घेतले जाणार
दहा व्यक्तींच्या पथका मार्फत जिल्ह्यातील विविध ठिकाणी जाऊन दिवसभरात ४०० व्यक्तींचे रक्तजल नमुने घेतले जाणार आहे. कोरोना आजाराला घाबरलेले नागरीक देखील या पथकाला अवश्यक ते सर्व सहकार्य करत आहेत. पथकासोबत महापालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश सिंह बिसेन व इतर आरोग्य कर्मचारीही आहेत.  

हेही वाचा- कंटेनरखाली बाळाला फेकणाऱ्या निर्दयी मातेला पोलिस कोठडी

इतवारा भागात असे वाढताहेत रुग्ण 
शहरात पहिला कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण पीरबुऱ्हाण भागात सापडला. त्यानंतर अबचलनगर आणि तिसरा रुग्ण सेलु तालुक्यातील आढळुन आला. पहिल्यांदाच पॉझिटिव्ह झालेल्या तीन्ही पॉझिटिव्ह रुग्णांपैकी दोघांना उच्चरक्तदाब, मधुमेह, श्वसनाचा त्रास होत असल्याने त्यांचा मृत्यू झाला. तर रहेमत नगर येथील एका महिलेवर खासगी रुग्णालयात ‘सारी’ आजाराचा उपचार सुरु असताना तिचा अहवाल पॉझिटिव्ह आला आणि ‘ती’ महिलाही मृत्यू पावली. त्या पाठोपाठ गुरुद्वारा परिसरातील अनेकांना कोरोनाची लागण झाली. इतवारा भागातील करबला नगर, कुंभारटेकडी परिसर, गाडीपुरा अशा भागात कोरोनाचा शिरकाव झाला आणि दिवसेंदिवस या परिसरात रुग्णांची संख्या वाढत चालली आहे.   

loading image