esakal | दोन आमदारांचे रुग्णालयात तर एका आमदाराचे बालगृहात रक्षाबंधन
sakal

बोलून बातमी शोधा

नांदेड - आमदारांनी रुग्णालयात रक्षाबंधन साजरे केले

कॉँग्रेसचे विधान परिषदेतील प्रतोद आमदार अमर राजूरकर व त्यांच्या मुलीला आणि कॉँग्रेसचे हदगावचे आमदार माधव पाटील जवळगावकर यांना कोरोनाचा संसर्ग झाल्यानंतर ते मुंबईच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाले आहेत. त्यामुळे त्यांना रक्षाबंधनाचा दिवस रुग्णालयात साजरा करावा लागला.

दोन आमदारांचे रुग्णालयात तर एका आमदाराचे बालगृहात रक्षाबंधन

sakal_logo
By
अभय कुळकजाईकर

नांदेड - नांदेड जिल्ह्यातील दोन आमदारांनी रुग्णालयात रक्षाबंधन साजरे केले तर एका आमदाराने सुमन बालगृहाला भेट देऊन तेथील अनाथ मुलींकडून राखी बांधून सोमवारी (ता. तीन) रक्षाबंधनाचा सण साजरा केला.
 
नांदेड जिल्ह्यात आत्तापर्यंत पालकमंत्री अशोक चव्हाण, आमदार मोहन हंबर्डे, माजी महापौर अब्दुल सत्तार, त्याचे चिरंजीव नगरसेवक यांच्यासह काही सदस्यांना कोरोनाचा संसर्ग झाला होता. त्यातून ते बरे झाले. त्यानंतर कॉँग्रेसचे विधान परिषदेतील प्रतोद आमदार अमर राजूरकर व त्यांच्या मुलीला आणि कॉँग्रेसचे हदगावचे आमदार माधव पाटील जवळगावकर यांना कोरोनाचा संसर्ग झाला. 

हेही वाचा - नांदेड जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांचे द्विशतक

आमदारांचे रुग्णालयात रक्षाबंधन
कॉँग्रेसचे विधान परिषदेतील प्रतोद आमदार अमर राजूरकर व त्यांच्या मुलीला आणि कॉँग्रेसचे हदगावचे आमदार माधव पाटील जवळगावकर यांना कोरोनाचा संसर्ग झाल्यानंतर ते मुंबईच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाले आहेत. त्यामुळे त्यांना रक्षाबंधनाचा दिवस रुग्णालयात साजरा करावा लागला. त्यामुळे या दोघांनी रुग्णालयातील डॉक्टर आणि परिचारिका यांच्याकडून राखी बांधून घेतली आणि रक्षाबंधन साजरे केले त्याचबरोबर मोबाईलद्वारे घरच्यांशी व नातेवाईकांशी संपर्क साधून शुभेच्छा दिल्या.  

कल्याणकर यांनी दिली बालगृहाला भेट
शिवसेनेचे नांदेड उत्तरचे आमदार बालाजी कल्याणकर यांनी सुमन बालगृह येथे सोमवारी (ता. तीन) रक्षाबंधनाचा सण साजरा केला. यावेळी उपस्थित अनाथ मुलींनी आमदार कल्याणकर यांना व त्यांच्यासमवेत आलेल्या पदाधिकाऱ्यांना राख्या बांधल्या. यावेळी बालगृहाचे संचालक अनिल दिनकर, दर्शनसिंग संधू, नितीन सरोदे, मनमीत कुंजीवाले, प्रविण पाटील आदी उपस्थित होते. 

हेही वाचलेच पाहिजे - नांदेड : शहर वाहतुक शाखेतील महिला पोलिसांचा वाहनधारकांना मनस्ताप

आमदार हंबर्डे यांना बांधल्या राख्या
रक्षाबंधनाच्या दिवशी आमदार मोहन हंबर्डे यांनी प्रत्यक्ष कोविंड सेंटरला भेट दिल्यानंतर तेथे कोरोना संसर्ग झालेल्या महिलांना आमदार हंबर्डे यांना राखी बांधण्याचा मोह आवरला नाही. परंतु प्रत्यक्ष तेथे राखी उपलब्ध नसल्याने या महिलांनी आमदार हंबर्डे यांना रक्षाबंधनाच्या शुभेच्छा दिल्या.आमदार हंबर्डे यांनीही काळजी करू नका आपण लवकरच या कोरोना रुपी संकटातून मुक्त होऊ अशी आशा व्यक्त केली.