
Nanded Accident | नांदेडमध्ये भीषण अपघात, दोन जण ठार
नांदेड : टाटा एअस व कर्नाटक महामंडळाची बस या दोन वाहनांची समोरासमोर धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात दोघे जण ठार झाले. ही घटना जानापुरी कॅम्पजवळ बुधवारी (ता.चार) दुपारच्या सुमारास घडली. या अपघातात (Accident) एअस या वाहनाचा चुराडा झाला असून अपघातातील काही जखमींना सोनखेड पोलिसांनी विष्णुपुरी येथील रुग्णालयात दाखल केले आहे. याबाबत मिळालेली माहिती अशी की, कर्नाटक महामंडळाची नांदेड- गुलबर्गा (केए-३८ एफ १०२१) ही बस बुधवारी दुपारी नांदेड बसस्थानकातून प्रवासी घेऊन निघाली होती. (Two People Died In Accident In Janapuri Camp Of Nanded)
हेही वाचा: Pfizer | फायझरने भारतात आशियातील सर्वात मोठे 'औषध विकास केंद्र' केले सुरु
भरधाव वेगातील ही बस जानापुरी कॅम्पसजवळ येताच लोह्याहून नांदेडकडे (Nanded) येणाऱ्या (एमएच २६ एडी ८११५) टाटा एअस या वाहनास जबर धडक दिली. समोरासमोर झालेल्या या अपघातात राम लक्ष्मण चिंतलवार (वय ३८) व धोंडीबा लक्ष्मण केंद्रे (वय (५५) हे दोघे जण ठार झाल्याची माहिती सुत्रांनी दिली. केंद्रे यांचा अपघातस्थळावरच तर चिंतलवार यांचा उपचारासाठी नेताना मृत्यू झाल्याचे काही प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.
हेही वाचा: Nanded|फिरण्यासाठी गेलेल्या तरुणाला टिप्परने उडवलं, उपचार सुरु असताना मृत्यू
अपघाताची माहिती मिळताच सोनखेड पोलीस ठाण्यातील सहायक पोलिस निरिक्षक भोसले, पोलिस उपनिरीक्षक परिहार, पोलीस कर्मचारी श्याम बनसोडे, अंगद कदम, उत्तम कांबळे या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन अपघातातील इतर जखमींना विष्णुपुरीच्या शासकीय रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले.
Web Title: Two People Died In Accident In Janapuri Camp Of Nanded
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..