esakal | वंचितची बुध्द प्रभा फेसबुकवर
sakal

बोलून बातमी शोधा

file photo

गुरूवारी (ता. सात) रोजी पहाटे पाच वाजता " बुद्धप्रभा " या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

वंचितची बुध्द प्रभा फेसबुकवर

sakal_logo
By
प्रल्हाद कांबळे

नांदेड : महाकारूणिक भगवान बुद्ध जयंतीनिमित्त गुरूवारी (ता. सात) रोजी पहाटे पाच वाजता " बुद्धप्रभा " या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम फेसबुक लाईव्ह होणार आहे.

'प्रबुद्ध भारत फेसबूक लाईव्ह', "बुद्धा'ज धम्मा", " इंजि. प्रशांत इंगोले फेसबुक लाईव्ह" व "फारुख अहमद फॅन्स क्लब" या  फेसबुक पेजवर हा कार्यक्रम थेट घरबसल्या सकाळी नऊ वाजेपर्यंत पाहता येणार आहे. जिल्हा वंचित बहुजन आघाडी तर्फे हा कार्यक्रम घेण्यात येणार आहे. वंचितचे जिल्हाध्यक्ष इंजि. प्रशांत इंगोले यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकाद्वारे ही माहिती दिली आहे. 

हेही वाचा -  लॉकडाऊन : ४० दिवसात ६७ लाखाचा मुद्देमाल जप्त...कुठे ते वाचा...

बुद्ध जयंतीनिमित्तसुद्धा वंचित बहुजन आघाडीचा "बुद्धप्रभा"

वंचितकडून गेल्या ता. १४ एप्रिल रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती "भीम पहाट" फेसबुक लाईव्ह करण्यात आली होती. या कार्यक्रमाचा लाखो रसिकांनी घरबसल्या आनंद घेतला होता. सध्या 'कोरोना' विषाणूच्या प्रादुर्भावामुळे नांदेड जिल्हा तसेच सबंध देशभरात लॉकडाऊन परिस्थिती आहे. 
भगवान बुद्ध जयंतीनिमित्तसुद्धा वंचित बहुजन आघाडीने यावेळी "बुद्धप्रभा" हा फेसबुक लाईव्ह कार्यक्रम सादर करण्याचे योजिले आहे. या कार्यक्रमामध्ये केवळ तीन जणांचा वाद्यवृंद हा बुद्ध जयंती कार्यक्रम सादर करणार आहे. ज्यामध्ये सुप्रसिद्ध तबलावादक शुद्धोधन कदम, ऑर्गन वादक महेंद्र कदम, ॲक्टोपॅड वादक रतन चित्ते यांचा सहभाग राहणार आहे.

हे घेत आहेत परिश्रम 

"बुद्धप्रभा" या कार्यक्रमातील भगवान बुद्ध आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर गीते महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध गायक नामदेव इंगळे, संजय भगत, युवराज तारू, आनंद कीर्तने, कव्वाल ललकार बाबु आदी सादर करणार आहेत. वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश प्रवक्ते फारूक अहमद, कनिष्क सोनसळे, महासचिव साहेबराव बेळे, केशव कांबळे, प्रमिला वाघमारे रूपक जोंधळे, प्रा. अविनाश नाईक, डॉ. संतोष वाठोरे पद्माकर सोनकांबळे, के. एच. वने, डॉ. विलास भद्रे, मुकुंद चावरे, दीपक कसबे, दिलीप जोंधळे, सचिन नवघडे, गणेश सूर्यवंशी, ऋषिकेश शिवणीकर, राहुल इंगोले, राहुल कदम आदींनी या कार्यक्रमासाठी पुढाकार घेतला आहे.

loading image