esakal | Video - भाजपने केला कपटी चिनी ड्रॅगनचा निषेध
sakal

बोलून बातमी शोधा

नांदेडला चीनचा निषेध करत भाजपने आंदोलन केले.

नांदेडला वजिराबाद भागात भारतीय जनता पक्षातर्फे गुरूवारी सीमेवर शहीद झालेल्या भारतीय जवानांना श्रद्धांजली वाहून चीनचा निषेध करत आंदोलन करण्यात आले तसेच चिनी वस्तूवर बहिष्कार टाकण्याचे आवाहन करण्यात आले.

Video - भाजपने केला कपटी चिनी ड्रॅगनचा निषेध

sakal_logo
By
अभय कुळकजाईकर

नांदेड - भारतीय जनता पक्षाच्या वतीने पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी गुरूवारी (ता. १८ जून) सीमेवर शहीद झालेल्या भारतीय जवानांना श्रद्धांजली वाहिली. त्यानंतर चीनचा निषेध करत आंदोलन केले. त्याचबरोबर चिनी वस्तूवर बहिष्कार टाकण्याचे आवाहन करण्यात आले.

चिनी वस्तूंवर बहिष्कार घालण्यासाठीच्या आंतरराष्ट्रीय आंदोलनाला
भारतासह जगभरातील इतर देशांतील प्रमुख शहरांमधून प्रतिसाद मिळाला. राष्ट्रप्रेमी नागरिकांनी चिनी मोबाईल, खेळणी, गृहपयोगी वस्तू कचऱ्याच्या डब्यात फेकल्या. नांदेडलाही भाजपच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी आंदोलन करत चीनचा निषेध केला. 

हेही वाचा - नागरी कृती समितीचा कोरोना जनजागृतीसाठी पुढाकार... 

चिनी वस्तूंवर बहिष्कार घालण्याचे आवाहन
आधी कोरोना विषाणू आणि आता लडाखमध्ये २० भारतीय जवानांच्या हुतात्मा होण्याला उत्तरदायी असलेल्या कपटी चिनी ड्रॅगनला धडा शिकवण्यासाठी भारतीय जनता पक्षासह सनातन संस्था, हिंदु जनजागृती समिती व अन्य हिंदुत्वनिष्ठ संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने आंतरराष्ट्रीय स्तरावर गुरुवारी प्रतिकात्मक आंदोलन करण्यात आले. यात राष्ट्रप्रेमी भारतीयांनी ‘चिनी वस्तूंवर बहिष्कार घाला’ आंदोलन केले. या आंदोलनाद्वारे चीनचा निषेध करण्यात आला.

भारतासह जगभरात चीनच्या विरोधात आंदोलन
कपटी चीनविरोधात आज संपूर्ण भारतातच नव्हे, तर जागतिक स्तरावर वातावरण ढवळून निघत आहे. चीनला धडा शिकवण्यासाठी प्रत्येकजण आपापल्या परीने लढा देत आहे. हा लढा व्यापक करण्यासाठी करण्यात आलेल्या आवाहनाला अनुसरून आज भारतासह अमेरिका, कॅनडा, इंग्लंड, फिनलॅन्ड, स्वीडन, लिबिया, इथोओपिया, संयुक्त अरब अमिरात, सौदी अरेबिया, कतार, कुवेत, मॉरिशस, ऑस्ट्रेलिया आदी देशांमध्ये हे आंदोलन करण्यात आले. भारतातील २० राज्यांमधून नवी दिल्ली, मुंबई, चेन्नई, बंगळूर, भोपाळ, हैद्रराबाद, पटना, अहमदाबाद, आगरतळा ही राजधान्या असलेली शहर, तसेच जोधपूर, फरीदाबाद, प्रयागराज, वाराणसी, गोरखपूर, इंदूर, उज्जैन, वापी, बडोदा, नागपूर, वर्धा, अमरावती, पुणे, नाशिक, कोल्हापूर, सोलापूर, नांदेड, जळगाव, धुळे, नंदुरबार, म्हैसूर, मंगळुरू, कोची आदी १४० शहरांतून हे प्रतिकात्मक आंदोलन करण्यात आले. 

राष्ट्रप्रेमी नागरिक एकत्र आले ट्विटरवर 
भारत सरकारने देशाच्या सीमा सुरक्षित ठेवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करावेत, तसेच आम्ही भारतीय म्हणून अंतर्गत स्तरावर चीनला धडा शिकवण्यासाठी कटीबद्ध आहोत, हा संदेश या आंदोलनाच्या माध्यमांतून देण्यात आला. आज या विषयावर राष्ट्रप्रेमी नागरिकांनी एकत्र येऊन ट्विटरवर #ChineseProductsInDustbin नावाने चालवलेल्या टे्रंड उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. काही वेळातच हा ट्रेंड देशात पहिल्या क्रमांकावर होता. त्यात ६५ हजारांहून अधिक ट्वीटस् करून नागरिकांनी चिनी वस्तूंवर बहिष्कार घालण्याचे आवाहन केले.

हेही वाचलेच पाहिजे - हिंगोली ब्रेकींग: कतार राष्ट्रातून परतलेल्या तरुणासह चौघे पॉझिटिव्ह, संख्या पोहचली ३३ वर

नांदेडमध्ये केला चीनचा निषेध
वजिराबाद भागातील मुथा चौक येथे झालेल्या या आंदोलनात भाजपाचे महानगर जिल्हाध्यक्ष प्रविण साले, प्रदेश प्रभारी युवा मोर्चाचे संजय कौडगे, युवा मोर्चा महानगराध्यक्ष संजय पाटील घोगरे, महानगर जिल्हा सरचिटणीस अशोक पाटील धनेगावकर, महानगरउपाध्यक्ष अनिलसिंह हजारी, शीतल खांडील, महानगर जिल्हाचिटणीस मनोज जाधव, सुनिल राणे, व्यंकटेश साठे, मंडळाध्यक्ष सूर्यकांत कदम, नवल पोकर्णा, आशिष नेरलकर, ग्रामिण उत्तर मंडळ सरचिटणीस आनंद पावडे, युवा मोर्चाचे दीपक कोठारी, श्रीराज चक्रावार, आशुतोष जोशी, चक्रधर पाटील कोकाटे, प्रज्ञाकोष्टचे गजानन जोशी, सहकार आघाडीचे अध्यक्ष संतोष परळीकर, नरेंद्र मोदी विचार मंचचे सोनू उपाध्याय, भाजपा सोशल मीडियाचे बाळू लोंढे, युवा मोर्चा सोशल मीडियाचे राज यादव, सन्नीसिंह बिसेन आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.