Video - जंगलराज विरोधात काँग्रेस रस्त्यावर; अशोक चव्हाणांच्या उपस्थितीत आंदोलन

नांदेड - पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या उपस्थितीत गुरूवारी आंदोलन करण्यात आले.
नांदेड - पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या उपस्थितीत गुरूवारी आंदोलन करण्यात आले.

नांदेड - उत्तर प्रदेशातील हाथरस येथील एका युवतीवर सामुहिक अत्याचार केल्यानंतर पोलिसांकडून मध्यरात्री पिडीतेच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले. या पिडीतेच्या कुंटुंबियाला भेटून सात्वंन करण्यासाठी जाणाऱ्या काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी व प्रियंका गांधी यांच्याशी पोलिसांनी धक्काबुक्की केल्यामुळे उत्तर प्रदेश सरकारचा निषेध करत या जंगलराजच्या विरोधात काँग्रेस रस्त्यावर उतरली असून पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या उपस्थितीत गुरूवारी (ता. एक आक्टोंबर) रात्री योगी सरकारच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले आहे.

उत्तर प्रदेशातील हाथरस येथील एका युवतीवर सामुहिक अत्याचार करण्यात आला होता. उपचार सुरु असतांना सदर पीडीत युवतीचा मृत्यू झाला. या घटनेचे पडसाद देशभर उमटले आहेत. काँग्रेसचे नेते खासदार राहुल गांधी, काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी पिडीतेच्या कुटुंबीयाची भेट घेण्यासाठी जात असतांना पोलिसांनी रस्त्यात दोन्ही नेत्यांना अडवून धक्काबुक्की केली तसेच त्यांना अटक केली. या घटनेचा काँग्रेस पक्षाच्या वतीने निषेध करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर गुरुवारी शहराच्या आयटीआय येथील महात्मा फुले पुतळ्यासमोर योगी सरकारच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करुन निषेध नोंदविण्यात आला आहे.

कॉँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी केला निषेध
यावेळी विधान परिषदेतील काँग्रेसचे प्रतोद आमदार अमर राजुरकर, आमदार मोहन हंबर्डे, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा मंगाराणी आंबुलगेकर, महापौर मोहिनी येवनकर, उपमहापौर मसुद खान, ज्योत्स्ना गोडबोले, सभापती संजय बेळगे, विजय येवनकर, काँग्रेस प्रवक्ते संतोष पांडागळे, विरेंद्रसिंघ गाडीवाले, किशोर भवरे, फारुख अली खान, उमेश पवळे, सुभाष रायभोले, अनिता इंगोले, मंगला धुळेकर, राजु यन्नम, महेंद्र पिंपळे, मुन्तजीब, संजय मोरे, शेरअली खान, भानुसिंह रावत, वाजीद जहागीरदार, अलीम खान, रहीम अहेमद खान, अब्दुल गफ्फार, मोहमंद नासेर, नागनाथ गड्डम, शमीम अब्दुल्ला, फईम, शंकर शिंदे, अतुल वाघ, दिनेश मोरताळे, सुषमा थोरात, जुबेर अहेमद, दुष्यंत सोनाळे, संदीप सोनकांबळे, चांदपाशा कुरेशी, रशीद खान पठाण, सदाशीव पुरी, राजु काळे, अमीत वाघ, विजय सोंडारे, संतोष कुलकर्णी, रुपेश यादवसह काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आंदोलनात सहभाग घेतला.

सरकारविरोधात काँग्रेस यापुढेही संघर्ष करणार 
यावेळी पालकमंत्री चव्हाण म्हणाले की, उत्तरप्रदेशातील हाथरस येथील युवतीवर झालेला अत्याचार व त्यानंतर पिडीतेवर पोलिसांकडून करण्यात आलेला परस्पर अंत्यसंस्कार मानवतेला काळीमा फासणारा आहे. पिडीतेच्या कुटुंबीयांची भेट घेण्यासाठी जाणाऱ्या काँग्रेस नेते राहुल गांधी व प्रियंका गांधी यांना अडवून पोलिसांकडून करण्यात आलेल्या धक्काबुक्कीचा शब्दात निषेध करत लोकशाहीची हत्या करणाऱ्या सरकारच्या विरोधात काँग्रेस यापुढेही संघर्ष करणार असुन काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंत आंदोलन सुरु असल्याचे त्यांनी सांगितले. “राहुल गांधी तुम संघर्ष करो, हम तुम्हारे साथ है”. असा नाराही त्यांनी यावेळी दिला. या प्रसंगी आमदार राजुरकर यांनीही मोदी व योगी सरकारच्या कार्यपद्धतीवर टीका केली. यावेळी देशातील मोदी सरकार व उत्तर प्रदेशातील योगी सरकारच्या विरोधात घोषणा देत योगी सरकारच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले आहे.

योगी आदित्यनाथ यांनी राजीनामा द्यावा
हाथरसमधील बलात्कार पीडितेच्या कुटुंबियांना भेटण्यासाठी निघालेले खासदार राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांना ज्या पद्धतीने रोखण्यात आले, धक्काबुक्की झाली, पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले ते पाहता उत्तर प्रदेशात लोकशाहीचे, कायद्याचे राज्य नसल्याचे स्पष्ट झाले. या घटनेबद्दल उत्तर प्रदेश सरकारचा करावा तेवढा निषेध कमी ठरेल. अशा परिस्थितीत पीडित कुटुंबाचे सांत्वन करण्यासाठी आणि तिथे नेमके काय घडले, याची माहिती घेण्यासाठी राहुल गांधी आणि प्रियंका गांधी हाथरसला जात असतील तर त्यात काहीही गैर नव्हते. तरीही त्यांना का अडवले गेले, याचे उत्तर भारतीय जनता पक्षाने दिले पाहिजे. तसेच या संपूर्ण घटनेची नैतिक जबाबदारी स्वीकारून उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणीही पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी केली.  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com