रस्त्यात अडविले, वाद घातला आणि चक्क तलवारीने...

file photo
file photo

नांदेड : जुन्या वादातून एकाला रस्त्यात अडवून तलवार व लोखंडी रॉडने जबर मारहाण करुन ठार मारण्याचा प्रयत्न केला. ही घटना ता. २३ मे रोजी रात्री आठच्या सुमारास आंबेडकरनगर येथे घडली. उपचारानंतर मंगळवारी (ता. २६) रात्री उशिरा हल्लेखोरांवर शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी तिन्ही मारेकऱ्यांना ताब्यात घेतले आहे. 

आंबेडकरनगर भागात राहणारा सुबोध सुनिल गजभारे (वय २०) याचे आणि याच भागातील अश्‍विन जगन सरोदे याच्यासोबत पाच महिण्यापूर्वी किरकोळ कारणावरून वाद झाला होता. यावेळी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात अश्‍विन सरोदेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. हा वाद सरोदे याच्या मनात घर करुन होता.

जुन्या वादाचा वचपा काढण्यासाठी त्याने आपल्या दोन मित्रांना बोलावून घेतले. शनिवारी (ता. २३) रात्री आठच्या सुमारास आपल्या दुचाकीवरुन सुबोध गजभारे हा घराकडे जात होता. यावेळी अश्‍विन सरोदे याने त्याला रस्त्यात अडवीले. माझ्यावर केलेली केस मागे घे, तुझी मस्ती अजून उतरली नाही का असे म्हणून सुरूवातीला थापडबुक्यांनी मारहाण केली. यावेळी सरोदे याचे दोन मित्र जवळ येताच या तिघांनी संगनमत करून सुबोध गजभारेला लोखंडी रॉड व तलवारीने जबर मारहाण केली. यात सरोदे याच्या डोक्याला व कानाला जबर दुखापत झाली. डोक्याला १८ टाके पडल्याचे तपासीक अंमलदार रवी वाहूळे यांनी सांगितले. या हाणामारीत योगेश शिकारे हासुद्धा जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरू आहे.

येथे क्लिक करा कर्जाचा हफ्ता भरावा की नाही? काय म्हणतात बॅंकवाले
 

हल्लेखोरांमधील एकजण जखमी

जखमी अवस्थेत सुबोध गजभारे याला विष्णुपूरी येथील शासकिय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. उपचारानंतर रुग्णालयातून सुटका झाल्यानंतर त्याने शिवाजीनगर पोलिस ठाणे गाठले. त्याच्या फिर्यादीवरुन अश्‍विन जगन सरोदे, जयदेव विलास गाडगे आणि योगेश शिकारे या तिघांविरुद्ध ठार मारण्याचा प्रयत्न, भारतीय हत्यार कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिस निरीक्षक अनंत नरुटे आणि सहाय्यक पोलिस निरीक्षक रवी वाहूळे यांनी घटनास्थळी पाहणी केली. पंचनामा करून रात्रीच जखमी आरोपीसह तिघांनाही ताब्यात घेतले आहे. गुरुवारी (ता. २८) या आरोपींना न्यायालयात हजर करण्यात येणार असल्याचे श्री. वाहूळे यांनी सांगितले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com