राष्ट्रीय युवा संघटनेचे दिल्लीत आंदोलन, काय आहे कारण?

प्रमोद चौधरी
Tuesday, 3 November 2020

‘सीएपीएफस’मध्ये एक लाखाहून अधिक रिक्त पदे, एसएससी जीडी २०१८ भरतीच्या पद संख्या वाढविण्यासाठी दिल्लीत राष्ट्रीय युवा संघटनेतर्फे आंदोलन करण्यात येत आहे.  

नांदेड : एसएससी जीडी २०१८ भरतीमध्ये पदे वाढवावीत अशी मागणी राष्ट्रीय युवा संघटनेच्या वतीने केली आहे. तसे निवेदनही सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांना देण्यात आले असून, १२ नोव्हेंबर रोजी दिल्लीमध्ये आंदोलन करण्यात येणार असल्याचे निवेदनात म्हटले आहे.   

एसएससी जीडी २०१८ भरतीतील पदांची संख्या वाढवून सर्व वैद्यकीय तंदुरुस्त उमेदवारांची मेगा यादी जाहीर करण्याची मागणी राष्ट्रीय युवा संघटनेने केलेली आहे. संघटनेचे युवा कार्यकर्ते सलमान शेख यांनी सांगितले की, एसएससी जीडीची भरती प्रक्रिया खूपच मंद चालत आहे.  केंद्रीय गृह मंत्रालयाच्या अंतर्गत सुरक्षा दलांच्या  ५५ हजार पदांसाठी लेखी आणि शारीरिक परीक्षा होऊनही, भरती प्रक्रियाला दोन वर्षाहून अधिक काळ झालेला आहे.  दरम्यान, रिक्त जागांची संख्या एक लाखांच्या पुढे गेली आहे.  

हेही वाचा - आधुनिक साधनांअभावी ग्रामीण विद्यार्थ्यांची होतेय पिछेहाट

ऑगस्ट २०१८ मध्ये ही प्रक्रिया सुमारे ५४ हजार ९५३ पदांच्या भरतीच्या जाहिरातींसह सुरू केली गेली.  पुरुषांसाठी ४७ हजार ३०७ आणि महिलांसाठी सात हजार ६४६ एवढे पद होते. या पदांसाठी लेखी व शारिरीक परीक्षादेखील घेण्यात आल्या. परंतु भरती प्रक्रिया दोन वर्षानंतरही पूर्ण झाली नाही.  दरम्यान, गुणवत्ता वाढीमुळे अनेक योग्य उमेदवार अपात्र ठरतील.  भरती प्रक्रियेच्या दिरंगाईमुळे बरेच उमेदवार आता २५ वर्षांपेक्षा जास्त वयाचे झाले आहेत आणि यापुढे कोणत्याही लष्करी भरतीसाठी पात्र राहिले नाहीत.  

हे देखील वाचाच - मुस्लिम समजालाही हवे शिक्षण व नोकरीत आरक्षण

तंदुरुस्त तरुणांना अद्यापही नियुक्ती पत्र नाही
दरम्यान केंद्र शासनाच्या विरोधात अर्धसैनिक दल संघटनेचे महासचिव रणवीर सिंग तसेच यंग अॅक्टीव्हिस्टचे  सलमान शेख यांनी संताप व्यक्त केला आहे. त्यांनी म्हटले की,  बिहार निवडणुकीत सत्तापक्ष आणि विपक्ष युवकांना लाखो रोजगार देण्याच्या  घोषणा करत आहेत.  परंतु २०१८ मध्ये कर्मचारी निवड आयोगांतर्गत अर्धसैनिक दलातील सैनिकांच्या ६० हजार जागांसाठी फॉर्म भरलेल्या ८५ हजार वैद्यकीय तंदुरुस्त तरुणांना अद्यापही नियुक्तीपत्रे देण्यात आलेली नाहीत.

येथे क्लिक कराच - खासगी कोविड सेंटरचे रुग्णसेवेचे स्वप्न भंगले, सोमवारी फक्त २९ जण पॉझिटिव्ह, ५९ कोरोनामुक्त

एक लाखावर पदे रिक्त
एक लाखाहून अधिक पदे रिक्त असतानाही केंद्र सरकारला गांभीर्य नाही. याकडे केंद्र शासनाचे लक्ष वेधण्यसाठी दिल्ली येथे आंदोलन करत असल्याचे सलमान शेख, भाग्यश्री वकारडे, चंद्रकांत केंद्र, नीता ठोंबरे, अक्षय घोरपडे आदींनी भारतातील सर्व एसएससी उमेदवारांनी आपापल्या मतदारसंघातील मुख्यमंत्री, खासदार, जिल्हा अधिकाऱ्यांना निवेदन देऊन १२ नोव्हेंबर रोजी दिल्ली चळवळीत शांततेत सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: What Is The Reason National Youth Organization Nanded News