esakal | नांदेड जिल्ह्यातील " या " गावाने का पाळला काळा दिवस
sakal

बोलून बातमी शोधा

अर्धापूर तालुक्यातील सावरगाव येथे काळा दिवस

नांदेड जिल्ह्यातील " या " गावाने का पाळला काळा दिवस ?

sakal_logo
By
लक्ष्मीकांत मुळे

अर्धापूर ( जिल्हा नांदेड ) : शेतकरी विरोधी कायद्यामुळे शेतकरी कचाट्यात अडकला आहे. त्यामुळे शेतक-यांना स्वतंत्र भारतात पारतंत्र्याचे जीवन जगावे लागत आहे. ही बंधने तोडण्यासाठी 'किसान पुत्र आंदोलन' ही संघटना काम करित असून या संघटनेच्या वतीने पहिल्या घटना दुरुस्तीच्या निषेधार्थ सावरगाव (ता. अर्धापूर ) येथील शेतक-यांनी आपल्या घरावर काळे झेंडे लावून आंदोलन केले.

शरद जोशी यांच्या विचाराने प्रेरित झालेला शेतकरी अजूनही पहिल्या घटनादुरुस्तीचा विरोध करत आहे. भारतीय राज्यघटनेने शेतकऱ्यांसाठी केलेल्या न्याय बंदीचा निषेध करत आपल्या घरावर काळे झेंडे लावून सावरगाव ग्रामस्थांनी मोठ्या प्रमाणात केंद्र सरकारचा निषेध केला आहे.

हेही वाचा - दिल्लीहून शुक्रवारी पश्चिम बंगालला परतणार होते, पण त्यांनी प्रयाण लांबणीवर टाकले. आता ते शनिवारी परतण्याची शक्यता आहे.

शेतकरी विरोधी पहिली घटना दुरुस्ती ता. 18 जून 1951 ला झाली त्या घटना दुरुस्तीत घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी शेतकऱ्यांकरिता दिलेले सर्व अधिकार गोठवून नवव्या परिशिष्टाची निर्मिती करुन त्यात तेरा शेतकरीविरोधी कायदे टाकण्यात आले. त्यात प्रामुख्याने तीन कायद्यांचा समावेश होता. यात आवश्यक वस्तुचा कायदा, सिलिंग कायदा, भूमि अधिग्रहण कायदा यामुळे शेतकऱ्यांवर अनेक बंधने आली आहेत. असा या संघटनेचा दावा आहे.

येथे क्लिक करा - हॉलिवूड, बॉलिवूड किंवा क्रीडा क्षेत्रातले तारे-सितारे हल्ली सामाजिक समस्यांवरही मुखर होऊ लागले आहेत, याला कारणीभूत आहे समाजमाध्यमांचे जबरदस्त पाठबळ!

शरद जोशींच्या विचारांना किसान पुत्राची संघटना "किसान पुत्र आंदोलन" पुढे नेण्याचे काम करित आहे. या संघटनेचे बालाजी आबादार नांदेड जिल्हातील शेतकरी या प्रश्नावर हिरिरीने भाग घेवून शेतकरी प्रश्नवर आवाज उठवित असतात. त्यांच्या मार्गदर्शनाखाली सावरगाव येथे आंदोलन करण्यात आले.यात विजय केशव जाधव, दत्ता केशव आबादार, राजेश पांचाळ इत्यादींसह गावकऱ्यांनी या आंदोलनात भाग घेतला व घरावर काळे झेंडे लावून निषेध करित काळा दिवस पाळला.

संपादन- प्रल्हाद कांबळे

loading image
go to top