esakal | आधारविना विद्यार्थ्यांना मिळणार नाही ‘आधार’
sakal

बोलून बातमी शोधा

school-

आधारविना विद्यार्थ्यांना मिळणार नाही ‘आधार’

sakal_logo
By
प्रमोद चौधरी

नांदेड : शिक्षक संचालकांनी फतवा जाहीर करून पहिली ते बारावीपर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांची पटसंख्या ग्राह्य धरण्यासाठी आधार नोंदणी अनिवार्य केली आहे. ज्यांच्याकडे आधार (Adhaar) नाही, ते विद्यार्थी ३० सप्टेंबरनंतर शाळेच्या पटसंख्येत ग्राह्य धरले जाणार नाहीत. शाळाबाह्य विद्यार्थी राहायला नको, असे शासन वेळोवेळी सांगत आले आहेत. मात्र, ज्यांची आधार नोंदणीच झाली नाही, मग ते विद्यार्थी शाळाबाह्य ठरणार नाहीत का? असा प्रश्न उपस्थित होत असला तरी आधार नोंदणीची तारीख ३० सप्टेंबर असल्याने नोंदणी करावीच लागणार आहेत. आधारची जबाबदारी शाळेची आहे की पालकांची? असा प्रश्न शाळांमधून शिक्षण संचालकांच्या फतव्यावरून केला जात आहे. बोगस विद्यार्थी दाखवून शाळा चालविणाऱ्यांना चाप बसावा यासाठी शिक्षण विभागाने (Education Department) शाळेच्या पटसंख्येनुसार पहिली ते बारावीच्या प्रत्येक विद्यार्थ्यांची (Nanded) आधार नोंदणी अनिवार्य केली आहे.

हेही वाचा: नांदेड जिल्ह्यात दिवसाढवळ्या महाविद्यालयीन विद्यार्थ्याचा खून

आधार नोंदणीसाठी शेवटची तारीख ३० सप्टेंबर ठरवून देण्यात आली आहे. ज्या विद्यार्थ्यांचे आधार क्रमांक युडाईज पोर्टलवर देण्यात आलेले नाहीत, अशी विद्यार्थी संख्या कमी पकडण्यात येईल. संचमान्यतेनुसार जे शिक्षक कार्यरत आहे, ते कमी होऊ शकतात. पटसंख्या पूर्ण दाखवण्यासाठी शाळांमध्ये जेवढे विद्यार्थी आहेत त्यांचे आधार ३० सप्टेंबरपर्यंत द्यावे लागणार आहे. दुसरीकडे शिक्षणाचा अधिकारी अधिनियम २००९ नुसार पहिली ते आठवीपर्यंत कोणत्याही विद्यार्थ्याला कोणत्याही कारणाने शाळाबाह्य करता येत नाही. आधार नसल्याने विद्यार्थी शाळाबाह्य होऊन अनेक समस्या उद्भवतील अशी चर्चा आहे.

हेही वाचा: चुकीच्या पत्त्यामुळे 'नीट' परीक्षा देणाऱ्यांची धांदल

शिक्षक ठरतील अतिरिक्त

या निर्णयामुळे आधार नसलेले कित्येक विद्यार्थी शाळाबाह्य ठरतील. आधार काढणे, अपडेट करणे हे काम प्रत्यक्षात पालकांचे आहे. पालकांनी मदत केली नाहीतर त्याचे अप्रत्यक्ष परिणाम शाळे होऊन तेथील शिक्षक अतिरिक्त ठरतील, अशी भिती आहे.

बोगस शाळांना बसणार चाप

बोगस पटसंख्या दाखवून अनुदान लाटण्याचे काम सध्या सुरु आहे. त्यामुळे अशा चुकीची पटसंख्या दाखविणाऱ्या बोगस शाळांना धडा शिकविण्यासाठी शिक्षण संचालकांनी काढलेला हा फतवा चांगल्या असल्याची प्रतिक्रिया शिक्षणतज्ज्ञांतून समोर येत आहे.

loading image
go to top