Nanded Crime : हिमायतनगरमध्ये तरूणाचा दगडाने ठेचून खून, आरोपी ताब्यात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Nanded Crime News

Nanded Crime : हिमायतनगरमध्ये तरूणाचा दगडाने ठेचून खून, आरोपी ताब्यात

हिमायतनगर (जि.नांदेड) : तालुक्यातील वाशी शिवारात जंगलाच्या पायथ्याशी एका तरूणाचा दगडाने ठेचून निर्घृण खून करण्यात आला आहे. ही घटना गुरूवारी (ता.आठ) दुपारी तीन वाजताच्या सुमारास घडली आहे. घटनेतील चार आरोपींना पोलीसांनी ताब्यात घेऊन पोलीस तपास करीत आहेत. मृतदेहांच्या शेजारी तांब्या, लिंब, फूल असे साहित्य आढळून आले असल्याने हा नरबळीचा प्रकार आहे की काय?

असा संशय व्यक्त केला जात आहे. मराठवाठा, तेलंगणा सीमारेषेवर वाशी शिवारात जंगलाच्या पायथ्याशी मृत पांडूरंग लक्ष्मण तोटेवार (वय ३२) या युवकाचा मृतदेह पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. (Nanded Crime News)

हेही वाचा: बिस्किटच्या स्पेलिंगवरुन अनुष्का शर्मा झाली ट्रोल, अभिनेत्रीने मागितली माफी

यातील आरोपींनी मृत युवकांस काहीतरी अमिष दाखवून रिक्षाने घेऊन गेले व तिथे त्याच्यावर पाच आरोपींनी हल्ला करून डोक्यात दगडाने वार करून निर्घृण खून केला आहे. आरोपीत एका महिलेचा ही सहभाग आहे. मृताच्या डोक्यात दगड घातल्याने डोक्याचा चेंदा मेंदा झाला. मृतदेह आरोपी ओढत असल्याचा एक व्हिडिओ देखील व्हायरल झाला आहे.

हेही वाचा: Brahmastra : 'ब्रह्मास्त्र'चा बंपर ओपनिंग, पहिल्या दिवशी ३० कोटींची कमाई?

हिमायतनगर पोलीस ठाण्यात मृताचा भाऊ विकास उर्फ बालाजी लक्ष्मण तोटेवार (वय ३८, रा. लकडोबा चौक, हिमायतनगर) यांच्या फिर्यादीवरून आरोपी परमेश्वर लक्ष्मण आकलवाड, लक्ष्मण आकलवाड, रमेश लक्ष्मण आकलवाड, लक्ष्मीबाई लक्ष्मण आकलवाड (रा. सर्व लकडोबा चौक, हिमायतनगर, जि. नांदेड) यांच्या विरूद्ध जूना वाद उकरून काढून मृत पांडुरंग लक्ष्मण तोटेवार याचा दगडाने ठेचून खून करण्यात आला आहे, अशी फिर्याद दिल्यावरून खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. अधिक तपास पोलिस निरीक्षक बी.डी.भुसनूर यांच्या मार्गदर्शनाखाली साहाय्यक पोलीस निरीक्षक बालाजी महाजन हे तपास करीत आहेत.

Web Title: Youth Brutally Killed In Himayatnagar Of Nanded

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :NandedCrime News