Brahmastra : 'ब्रह्मास्त्र'चा बंपर ओपनिंग, पहिल्या दिवशी ३० कोटींची कमाई? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Brahmastra First Day Box Office Collection

Brahmastra : 'ब्रह्मास्त्र'चा बंपर ओपनिंग, पहिल्या दिवशी ३० कोटींची कमाई?

Brahmastra first day box office : ब्रह्मास्त्र निराशाने घेरलेल्या बाॅलीवूडसाठी आशेचे किरण ठरु शकते. गेल्या काही काळापासून प्रेक्षकांना चांगल्या चित्रपटाची प्रतिक्षा होती. मात्र आतापर्यंत कोणत्याही हिंदी चित्रपटाने काही विशेष चुणूक दाखवली नव्हती. लालसिंग चड्ढा आणि रक्षाबंधनानंतर प्रत्येकाला ब्रह्मास्त्रकडून आशा होती. आगाऊ बुकिंगचे आकडे सांगतात, की आलिया भट (Alia Bhatt) आणि रणबीर कपूरचा (Ranbir Kapoor) चित्रपट हिट होणार आहे. एवढेच नाही तर चित्रपट पहिल्याच दिवशी ३० कोटींपेक्षा जास्त कमाई करु शकते.

हेही वाचा: करिना अन् करिश्माने साजरा केला गणशोत्सव, कपूर कुटुंबीय आले एकत्र

पहिल्या दिवशी किती होईल कमाई?

अयान मुखर्जीचा चित्रपट 'ब्रह्मास्त्र'च्या (Brahmastra Movie) निर्मितीसाठी जवळपास ९ वर्ष लागले. यावर त्यांनी खूपच मेहनत घेतली आहे. मग ती पटकथा असेल किंवा चित्रपटात वापरले जाणारे व्हीएफएक्स. आलिया भट आणि रणबीर कपूरची जोडी या चित्रपटाच्या माध्यमातून पहिल्यांदा मोठ्या पडद्यावर कमाल दाखवण्यास तयार आहे. चित्रपटावरुन बायकाॅट ट्रेंडही सुरु आहे. मात्र वाटते की बाॅयकाॅट ट्रेंडवरुन चित्रपटाच्या व्यवसायावर परिणाम होणार नाही.

हेही वाचा: Yashoda : समंथा प्रभूच्या 'यशोदा'चे टीझर आज होणार प्रदर्शित

वृत्तानुसार पहिल्या दिवसासाठी आतापर्यंत ब्रह्मास्त्रची २ लाखांपेक्षा अधिक तिकिटांची विक्री झाली आहे. दुसरीकडे पहिल्या विकेण्डसाठी ३ लाख तिकिटांची आगाऊ बुकिंग झाली आहे. आगाऊ बुकिंगच्या आकड्यानुसार आलिया आणि रणबीरचा चित्रपट पहिल्या दिवशी ३० कोटींपेक्षा अधिक कमाई करु शकते. ब्रह्मास्त्र हिंदी सिनेमासाठी एक बूस्टर सिद्ध होऊ शकते. तसेच मनोरंजनाबरोबरच खूप कमाईही करणार आहे. आनंदाची वार्ता ही की ब्रह्मास्त्र महानगर आणि छोट्या शहरांमध्ये चांगली कमाई करणार आहेत.

Web Title: Brahmastra First Day Box Office Prediction Ranbir Kapoor And Alia Bhatt

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..