esakal | Akola: भक्तांचे आराध्यदैवत विराहीतची माता ‘तुळजा भवानी’
sakal

बोलून बातमी शोधा

तुळजा भवानी मंदीर, तुळजापूर

अकोला : भक्तांचे आराध्यदैवत विराहीतची माता ‘तुळजा भवानी’

sakal_logo
By
प्रा. अविनाश बेलाडकर

मूर्तिजापूर (जि. अकोला) : तालुक्यातील श्री क्षेत्र विराहीतची तुळजा भवानी तुळजापूरच्या भवानीचे प्रतिरूप मानल्या जाते. भक्तांचे मनोरथ पूर्ण करणाऱ्या आदीशक्ती तुळजा भवानीवर भक्तांची अपार श्रद्धा आहे. तुलजा भवानी मातेच्या मंदिरात नवरात्री उत्सवात भक्तांची मोठ्या प्रमाणात गर्दी पाहवयास मिळते.

मूर्तिजापुरातून १८ किमी व पिंजरहून १० किमी अंतरावर श्री क्षेत्र विराहीत वसले आहे. विराहीतच्या तुळजा भवानीचे मंदिर निसर्गरम्य परिसरात आहे. मंदिराबाहेरील देवतांच्या मूर्ती बघीतल्यानंतर त्या मोघल काळातील असल्याची साक्ष पटते. २०० लोकवस्तीच्या विराहीत गावाच्या पूर्वेला मंदिर वसले आहे. सुमारे ७० वर्षांपूर्वी या परिसरातील तलाव फुटून त्याला नदीचे रुप प्राप्त झाले आहे. मंदिरासमोरच तळ्याची भिंत आहे. या भिंतीला लागून आसलाले सीताफाळाचे वन मात्र आजमितीस नामशेष आहे.

हेही वाचा: कोळसा संकट ही अफवा, भारत पॉवर सरप्लस देश; सीतारामण यांचा दावा

मंदिराच्या बाजुला शंकरभारती महाराजांची समाधी आहे. मंदिराच्या प्रशस्त आवारात स्व. चिंतामण राऊत यांनी लावलेली ब्रम्हा, विष्णू, महेश रुपातील वड, पिंपाळ, उंबराची त्रिवेणी असून, या महाकाय वृक्षांनी एक हजार फूट जागा व्यापलाली आहे. लगतच महादेवाचे मंदिर, तुळस, झोलेबाबांचे अधिष्ठान, विठ्ठल-रुक्मिणी मंदिर आहे. पाच वडाची झाडे या परिसराला निसर्गरम्यता प्रदान करतात. नवरात्रौत्सवात अश्विन शुद्ध प्रतिपदेला रात्री ९ च्या दरम्यान घटस्थापना केली जाते.

नऊ दिवस देवीला आंघोळ घालणे बंद असते. सकाळ- सध्याकाळ ६ वाजता आरती, काकडा आरती, सकाळी भागवत व रात्री कीर्तनाची परंपरा आजही सुरू आहे. मात्र, कोरोनामुळे खंडित झाली आहे. येथील मनोहर किडे यांनी सांगितलेल्या आख्यायिकेनुसार त्यांचे पणजोबा त्याकाळी नित्यनेमाने आपल्या कुळदैवताच्या दर्शनाला बैलगाडीने तुळजापूरला जात असत. वृद्धापकाळात त्यांनी या नित्यनेमाबाबत नतमस्तक होऊन असमर्थता दर्शविली. देवीने सोबत येण्याचा दृष्टांत त्यांना स्वप्नात दिला. मागे वळून बघितल्यास तिथेच थांबेन असा, इशाराही दिला. दृष्टांताची सत्यता तपासून बघण्याच्या उत्सूकतेपोटी विराहीत गावाजवळ त्यांनी मागे वळून बघीतले अन् देवी दर्शन देऊन लूप्त झाली. तिथेच देविची प्रतिष्ठापना झाली. हे देवस्थान जागृत देवस्थान म्हणून नावारूपाला आले.

हेही वाचा: मोदींनी केला दहा लाख कोटींच्या गतीशक्ती योजनाचा शुभारंभ

अन् बोकड बळीची प्रथा झाली बंद

गत १९ वर्षे देवीसमोर अखंड दीप सुरू आहे. नामदेव राऊत, साहेबराव राऊत, यशवंत राऊत यांच्या पुढाकारातून व भक्तांच्या योगदानातून सभागृह निर्माण झाले आहे. श्रीकृष्ण राऊत यांनी चार एकर जमीन दान दिली आहे. सध्या गणेश राऊत संस्थानचे अध्यक्ष आहेत. चैत्र महिन्यातील पौर्णिमेला आणि नवरात्रौत्सवात हजारो भक्त दर्शनाला येतात. त्यामुळे धार्मिक पर्यटन स्थळाचा दर्जा या शक्तीस्थळाला मिळावा अशी, ग्रामस्थ व भक्तांची मागणी आहे. ५० ते ६० वर्षांपूर्वी येथे बोकड बळीची प्रथा होती. स्व. महादेवराव राऊत व बाबन साधूबुवा यांनी देवीला बोकड बळी दाण्याची अमानुष प्रथा बंद केली. आजही त्या निर्णयाचे तंतोतंत पालन होत आहे. मुक्या जिवाची आर्त हाक ऐकून त्यांच्या आयुष्याची दोरी देवादिकांच्या नावावार कापली जाणार नाही. हा विचार रूजवत बोकड बळीच्या अमानुष प्रथेला तिलांजली देणारे श्री क्षेत्र विराहीत त्यामुळे आगळे शक्तीपीठ ठरते.

loading image
go to top