Navratri 2022 : नवदुर्गेतील तिसरी दुर्गा पद्मावती देवी

नवदुर्गा परिक्रमेतील तिसरी देवी म्हणून पद्मावती देवीचे स्थान
navratri festival
navratri festival esakal

पुणे : नवदुर्गा परिक्रमेतील तिसरी देवी म्हणून पद्मावती देवीचे स्थान आहे. करवीर महात्म्य आणि पुराणात या देवीच्या ठिकाणचे विशेष स्थान आहे. आज या नवदुर्गांपैकी दुसरी देवी म्हणजेच पद्मावती मातेबद्दल जाणून घेऊया...

कोल्हापुरात मंगळवार पेठेतील जयप्रभा स्टुडिओसमोर पद्मवतीदेवीचे मंदिर आहे. या ठिकाणाला पद्मा, पद्मालया असे म्हणूनही ओळखतात. मंदिराजवळ पूर्वी पद्माळे नावाचे तळे ही होते.

या तळ्याच्या काठावर भक्त प्रल्हादाने तपश्चर्या करून नृसिहदेवांना प्रसन्न करून घेतले होते. त्यामुळे त्याचे पितृदोष नष्ट झाले. त्यामुळं पुराणात या ठिकाणाला पितृदोष नष्ट करणारे तळे म्हणून ओळखतात. या मंदिरात देवी पद्मवतीची चतुर्भुज मूर्ती आहे. हातात खडग आणि ढाल आहे. उग्र आणि सौम्य रुपात आहे.

या मंदिरात श्रीविष्णू, नाईकबा, नागराज, हनुमान, सटवाई, गजेंद्रलक्ष्मी , श्री गणेश अगस्ती लोपामुद्रा , भक्त प्रल्हाद इत्यादी देवतांच्या मूर्ती आहेत. सध्या या ठिकाणचे पद्माळा तळे मुजले गेले असून आता ते बैलगाडी शर्यतीसाठी प्रसिद्ध आहे.

आपल्यामुळे आपल्या पित्याचा वध झाला, याबद्दल मी काय करू, असे भक्त प्रल्हादाने नारद मुनींना विचारले. तेव्हा त्यांनी करवीर नगरीत जाण्याचा सल्ला त्यांना दिला. त्यांनी पद्माळा याठिकाणी तपश्चर्या केली आणि तिथे देवि पद्मावती प्रकट झाली. मी आणि नृसिंह एकच आहोत असे सांगत देवीने भक्त प्रल्हाद याना नृसिंह रूप दाखवले, अशी आख्यायिका प्रसिद्ध आहे, अशी माहिती इतिहास अभ्यासक शरद तांबट यांच्या करवीक नवदुर्गा या पुस्तकात आहे.

या आहेत नवदुर्गा

कोल्हापुरात अंबाबाई मातेच्या दर्शनासोबतच नवरात्रीच्या काळात या नवदुर्गांचे दर्शन घेण्याची प्रथा आहे. यामध्ये एकांबिका (एकविरा देवी), मुक्तांबिका (गजेंद्रलक्ष्मी) पद्मांबिका (पद्मावती देवी), प्रियांगी देवी (फिरंगाई) , कमलजा (कमलांबिका देवी), महाकाली (कलांबिका देवी) , अनुगामिनी (अनुगाई देवी), गजलक्ष्मी (गजांबिका देवी), श्रीलक्ष्मी यांचा समावेश आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com